महात्मा गांधी हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, भाजप प्रवक्ता बरळला

काही दिवसांपासून महात्मा गांधींबद्दल भाजप नेते करत असलेल्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपवर सर्वच स्तरातून मोठी टीका होत आहे.

काही दिवसांपासून महात्मा गांधींबद्दल भाजप नेते करत असलेल्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपवर सर्वच स्तरातून मोठी टीका होत आहे.

  • Share this:
    भोपाळ, 17 मे : भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असताना आणखी एक भाजप प्रवक्ता बरळला आहे. 'महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे,' असं मध्य प्रदेशातील भाजप प्रवक्ता अनिल सौमित्र याने म्हटलं आहे. 'गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक,' अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट या भाजप प्रवक्त्याने लिहिली आहे. काही दिवसांपासून महात्मा गांधींबद्दल भाजप नेते करत असलेल्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपवर सर्वच स्तरातून मोठी टीका होत आहे. अशा वाचाळवीरांची पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी समोर येत आहे. काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंह? 'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या होत्या. भाजपच्या मंत्र्याकडून समर्थन 'साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे,' असं भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे. 'साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागायची गरज नाही. 70 वर्षानंतरही आजची पिढी याबाबत बोलते याबद्दल मला आनंद वाटतो. गोडसे यांच्या अत्म्यालाही समाधान, आनंद मिळत असेल,' असं अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे. VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार
    First published: