नवी दिल्ली, 12 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीकरांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सात राज्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होणार असून त्यासाठी 979 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, दिल्लीतील 7 आणि झारखंडमधील 4 जागांचा समावेश आहे.