भाजपला किती जागा मिळणार? अमित शहांनी पहिल्यांदाच सांगितला नंबर!

भाजपला किती जागा मिळणार? अमित शहांनी पहिल्यांदाच सांगितला नंबर!

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधीच पंतप्रधानपदी कोण बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे. तसंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबाबतचे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले आहेत. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.

'या निवडणुकीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. आम्हाला स्वबळावर 300 पेक्षा जास्त जागा मिळतील. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनएडीएचं सरकार स्थापन केलं जाईल,' असा दावा अमित शहा यांनी केला आहे.

'त्यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी बैठका घ्याव्यात'

विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अमित शहा यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'त्यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी बैठका घ्याव्यात. कारण त्यांना विरोधी पक्षनेता बसवण्याएवढ्याही जागा मिळणार नाहीत.'

विरोधकांची मोर्चेबांधणी

राजधानी दिल्लीतील राजकीय हलचालांनी वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

VIDEO : सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द, कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला चोप

First Published: May 15, 2019 02:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading