S M L

प्रियांका नाही वाराणसीतून काँग्रेसचा 'हा' नेता देणार मोदींना टक्कर

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अखेर काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

Updated On: Apr 25, 2019 12:39 PM IST

प्रियांका नाही वाराणसीतून काँग्रेसचा 'हा' नेता देणार मोदींना टक्कर

लखनौ, 24 एप्रिल : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अखेर काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवरून काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रियांका गांधी इथून लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

2014ची आकडेवारी काय सांगते

दोन लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे अंतर असते. 2014मध्ये मोदींची लाट होती. ती लाट यावेळी दिसत नाही. पण गेल्या निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली ही आकडेवारी देखील महत्त्वाची ठरते. 2014मध्ये मोदींनी 5 लाख 81 हजार 022 मते मिळाली होती. दुसऱ्या नंबरवर असलेल्या अरविंद केजरीवला यांना 2 लाख 09 हजार 238 तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 75 हजार मते मिळाली होती.


बीएसपीच्या उमेदवाराला 60 हजार 579 तर सपाला 45 हजार 291 मते मिळाली होती. या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्व विरोधकांना मिळालेल्या मतांपेक्षा मोदींना मिळालेली मते अधिक होती.

असे आहे वाराणसीमधील जातीय समीकरण

वाराणसीमध्ये व्यापारी वर्गातील मतदार सर्वाधिक आहे. त्यांची संख्या 3.25 लाख इतकी आहे. त्यानंतर साडेतीन लाख मुस्लिम, अडीच लाख ब्राह्मण, दोन लाख पटेल, दीड लाख यादव, सव्वा लाख भूमीधारक, एक लाख रजपूत, 80 हजार चौरसिया, 80 हजार दलित आणि 70 हजार अन्य जातीचे मतदार आहेत. यातील व्यापारी आणि ब्राह्मण हे दोन भाजपचे पारंपारिक मतदार मानले जातात. मात्र नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नाराज झालेला वर्ग काँग्रेसकडे वळू शकतो. या वर्गातील मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे काम काँग्रेसला करावे लागले. तर एससी/एसटी कायद्यामुळे ब्राम्हण समाज नाराज आहे. विश्वनाथ कॅरिडॉरच्या निर्मितीसाठी ब्राम्हण समाजाची घरे सर्वाधिक पाडण्यात आली आहेत. या दोन्हीमुळे हा वर्ग नाराज आहे. त्यामुळे तो काही प्रमाणात काँग्रेसकडे वळू शकतो. याशिवाय मुस्लिम मते देखील महत्त्वाची ठरतात. ज्या उमेदवारामध्ये भाजपला हरवण्याची क्षमता आहे अशा पक्षालाच मुस्लिम मते मिळतात असे मानले जाते.

Loading...


VIDEO: NCP नगरसेविकेच्या पतीवर कुऱ्हाड, तलवारीनं सपासप वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 12:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close