उत्तर प्रदेशात भाजपला बसू शकतो मोठा धक्का, 'या' नेत्याची उमेदवारी धोक्यात

उत्तर प्रदेशात भाजपला बसू शकतो मोठा धक्का, 'या' नेत्याची उमेदवारी धोक्यात

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्याची घोषणा करणारे जवान तेजबहाद्दूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर आता भाजपलाही धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

लखनौ, 3 मे : लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्याची घोषणा करणारे जवान तेजबहाद्दूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर आता भाजपलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर लढणारे अभिनेते रवी किशन यांची उमेदवारी अडचणीत सापडली आहे.

या निवडणुकीत गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करताना रवी किशन यांनी आपण बारावी उत्तीर्ण असल्याचं सांगितलं आहे. पण याच रवी किशन यांनी 2014 च्या निवडणूक शपथपत्रात ते पदवीधर असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे रवी किशन आता अडचणीत आले आहेत.

रवी किशन यांच्या शपथपत्रातील या तफावतीवरून आता विरोधकांकडून त्यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. गोरखपूरसारख्या हायप्रोफाईल जागेवरील व्यक्तीचीच उमेदवारी धोक्यात आल्याने भाजपच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.

रवी किशन यांची राजकीय कारकीर्द

अभिनेता रवी किशन उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या 21व्या यादीत याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 2014मध्ये रवी किशन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत रवी किशन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूरमधून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली होती.


SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी प्रियांका गांधी असा करतायत प्रचार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 10:25 AM IST

ताज्या बातम्या