13 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमधील बहराइचमधून सावित्राबाई फुले, मुरादाबाद राज बब्बर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने 15 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत काँग्रेसने 36 उमेदवार जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं
नागपूर- नाना पाटोले
गडचिरोली- नामदेव मुसंडी
मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा
सोलापूर- सुशिलकुमार शिंदे
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे उमेदवार
नगीना- ओमवती देवी जथाव
मुरादाबाद - राज बब्बर
खेरी - जफर अली नकवी
सीतापूर - कैसर जहान
मिसरीख - मंजरी राही
मोहनलालगंज - रामशंकर भार्गव
सुलतानपूर - डाॅ.संजय सिंह
प्रतापगढ - रत्ना सिंह
कानपूर - श्रीप्रकाश जयस्वाल
फतेहपूर - राकेश सचन
बहराइच - सावित्री फुले
संत कबीर नगर - परवेझ खान
बांगसगाव - कुश सौरभ
लालगंज - पंकज मोहन सोनकर
मिर्जापूर - ललितेश पति त्रिपाठी
रॉबर्ट्सगंज - भगवती प्रसाद चौधरी
ही आहे काँग्रेसच्या 15 उमेदवारांची पहिली यादी
सोनिया गांधी - रायबरेली, उत्तर प्रदेश
राहुल गांधी - अमेठी, उत्तर प्रदेश
इम्रान मसूद - सहारनपुर, उत्तर प्रदेश
सलीम इकबाल शेरवानी - बदायूं, उत्तर प्रदेश
जितिन प्रसाद - धौरहरा, उत्तर प्रदेश
अन्नू टंडन - उन्नाव, उत्तर प्रदेश
सलमान खुर्शीद - फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश
राजाराम पाल - अकबरपूर, उत्तर प्रदेश
ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश
निर्मल खत्री - फैजाबाद, उत्तर प्रदेश
आर.पी. एन. सिंग - कुशी नगर, उत्तर प्रदेश
राजू परमार - पश्चिम अहमदाबाद, गुजरात
भारतसिंह सोलंकी - आनंद, गुजरात
प्रशांत पटेल - वडोदरा, गुजरात
रणजीत मोहनसिंग रतवा - छोटा उदयपूर, गुजरात
============================================================================