'या' उमेदवारामुळे निवडणूक आयोग मालामाल, मिळाले 14.5 कोटी!

'या' उमेदवारामुळे निवडणूक आयोग मालामाल, मिळाले 14.5 कोटी!

2014च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाला अनामत रक्कम जप्त झाल्यापोटी 14.5 कोटी रुपये मिळाले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. 11 एप्रिल रोजी देशातील 92 मतदारसंघात मतदान झाले. आता 18 तारखेला 13 राज्यातील 97 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उमेदवारांकडून अर्ज भरताना दिली जाणारी अनामत रक्कम होय. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्या उमेदवारांना एकूण मतांपैकी 1/6 पेक्षा कमी मते मिळतात त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते.

2014च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाला अनामत रक्कम जप्त झाल्यापोटी 14.5 कोटी रुपये मिळाले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आयोगाने काही नियम निश्चित केले आहेत. उमेदवाराचे वय 25 हवे आणि तो नोंदणीकृत मतदार हवा. याशिवाय अर्ज भरताना त्याला अनामत रक्कम जमा करावी लागते. उमेदवाराला ही रक्कम तेव्हाच मिळते जेव्हा एकूण झालेल्या मतदानाच्या 1/6 मते त्याला मिळतात. विशेष म्हणजे अधिकतर उमेदवारांचा केवळ पराभव होत नाही तर त्यांची अनामत रक्कम देखील जप्त होते. त्यामुळे हे सर्व पैसे आयोगाला मिळतात.

गेल्या निवडणुकीत 10मधील 8हून अधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. 2014मध्ये 84.9 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. यात एससी उमेदवारांची संख्या सर्वात जास्त होती. सर्व सामान्य वर्गातील 83.3 टक्के तर एसटी वर्गातील 80.5 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. धक्कादायक म्हणजे देशभरात 6 जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती. यात गाझियाबादमधील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांचा देखील समावेश होता.

पक्षांचा विचार केल्यास गेल्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवारांची अनामत रक्कम सर्वाधिक जप्त झाली होती. बसपाच्या 89.1 टक्के उमेदवारांची रक्कम जप्त झाली होती. काँग्रेसच्या 38.4 टक्के, तृणमूलच्या 67.2 टक्के, भाजपचे 14.5 टक्के, भाकप 85.1 टक्के, माकप 53.8 टक्के तर राष्टवादी काँग्रेसचे 36.1 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. याशिवाय अपक्ष असलेल्या 3 हजार 218 उमेदवारांची 6.7 कोटींची अनामत रक्कम जप्त झाली होती.

VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...

First published: April 13, 2019, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading