VIDEO भाजपला फायदा पोहोचविण्यापेक्षा मी मरण पत्करेन - प्रियंका गांधी

'ही जीवन मरणाची लढाई आहे. विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आम्ही सर्वस्व पणाला लावून लढतोय.'

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 03:28 PM IST

VIDEO भाजपला फायदा पोहोचविण्यापेक्षा मी मरण पत्करेन - प्रियंका गांधी

रायबरेली 02 मे : उत्तर प्रदेशात काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिले नाहीत. भाजपला फायदा होण्याचा प्रश्नच नाही. असा फायदा पोहोचविण्याआधी मी मरण पत्करेल अशी भूमिका काँग्रसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज स्पष्ट केली. जिथे काँग्रेस जिंकण्याची शक्यता नाही तिथे आम्ही कमकुवत उमेदवार दिले असं प्रियंका गांधी यांनी म्हटल्याचं वृत्त आल्यानंतर काँग्रेसवर टीका होत होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

भाजपला नुकसानच

प्रियंका गांधी म्हणाल्या, काँग्रेसने सर्व उमेदवार हे सक्षम दिले आहे. आमचा कुठलाही दुसऱ्या हेतू नाही. भाजपला फायदा होईल असं आम्ही काहीही करणार नाही. उलट आमचे उमेदवार भाजपची मतं खातील. हे आम्ही खूप विचारपूर्वक केलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.



'करो या मरो'

ही जीवन मरणाची लढाई आहे. विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आम्ही सर्वस्व पणाला लावून लढतोय. त्यासाठीच मी राजकारणात आली आहे. प्रियंका गांधी यांच्या बुधवारच्या वक्तव्यानंतर असं बोललं जात होतं की काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्यामुळे भाजपला फायदा होणार आहे तर बसपा-सपा आघाडीला नुकसान होणार आहे.

मुलांना प्रियंका गांधींपासून दूर ठेवा

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासमोर लहान मुलं 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देणारा व्हीडीओ व्हायरल झाला आणि नव्या वादाला तोंड फुटलं. त्यावरूनच अमेठीच्या भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केलीय. सुसंस्कृत कुटुंबांनी आणि पालकांनी आपल्या मुलांना प्रियंका गांधी यांच्यापासून दूर ठेवावं असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. ANIला दिलेल्या मुलखतीत त्यांनी ही टीका केली.

संस्कार नाही

अमेठीच्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांच्या भोवती लहान मुलांनी गराडा घातला होता आणि ते चौकीदार चोर है अशा घोषणा देतात. ही घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीही घातली. शिवी घातल्याबरोबर प्रियंकांनी तोंडावर हात ठेवल्याचं व्हीडीओत दिसतं आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली.

ही संधी साधत स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केलाय. त्या म्हणाल्या, प्रियंका या मुलांसमोर कुठला आदर्श ठेवत आहेत? त्या मुलांना चुकीची शिकवण देत आहे. पंतप्रधानांना दुषणं देण्यासाठी त्या मुलांना सांगत आहेत. या कृतीतून प्रियंका गांधी यांचं खरं रुप दिसलं अशी टीकाही त्यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close