'भाजप'चा पराभव हाच माझा उद्देश - प्रियंका गांधी

'भाजप'चा पराभव हाच माझा उद्देश - प्रियंका गांधी

भाजपला फायदा होईल असं आम्ही काहीही करणार नाही. उलट आमचे उमेदवार भाजपची मतं खातील.

  • Share this:

रायबरेली 02 मे : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी सध्या रायबरेलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजविरुद्ध जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपचा पराभव करणं हेच काँग्रेसचं मुख्य उद्दीष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसने उत्तर प्रदेशात पूर्ण ताकद लावली असून कुठल्याही परिस्थितीत भाजपला पराभव आम्हाला करायचं आहे असं त्या म्हणाल्या. काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिले असा आरोप काँग्रेसवर होतोय त्यावरही प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं.

...तर मरण पत्करेन

उत्तर प्रदेशात काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिले नाहीत. भाजपला फायदा होण्याचा प्रश्नच नाही. असा फायदा पोहोचविण्याआधी मी मरण पत्करेल अशी भूमिका काँग्रसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज स्पष्ट केली. जिथे काँग्रेस जिंकण्याची शक्यता नाही तिथे आम्ही कमकुवत उमेदवार दिले असं प्रियंका गांधी यांनी म्हटल्याचं वृत्त आल्यानंतर काँग्रेसवर टीका होत होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

भाजपलाच नुकसान

प्रियंका गांधी म्हणाल्या, काँग्रेसने सर्व उमेदवार हे सक्षम दिले आहे. आमचा कुठलाही दुसऱ्या हेतू नाही. भाजपला फायदा होईल असं आम्ही काहीही करणार नाही. उलट आमचे उमेदवार भाजपची मतं खातील. हे आम्ही खूप विचारपूर्वक केलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.

ही जीवन मरणाची लढाई आहे. विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आम्ही सर्वस्व पणाला लावून लढतोय. त्यासाठीच मी राजकारणात आली आहे. प्रियंका गांधी यांच्या बुधवारच्या वक्तव्यानंतर असं बोललं जात होतं की काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्यामुळे भाजपला फायदा होणार आहे तर बसपा-सपा आघाडीला नुकसान होणार आहे.

First published: May 2, 2019, 4:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading