नवी दिल्ली, 02 एप्रिल : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाची देखील सर्वत्र चर्चा आहे. शिवाय, राहुल गांधींमध्ये झालेल्या बदलांबद्दल बोललं जात आहे. पण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण कोण लिहितं माहित आहे? जवाहरलाल नेहरू विद्यापाठाचे विद्यार्थी असलेले आणि 2005मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांना काळे झेंडे दाखवणारे संदीप सिंह राहुल गांधी यांचं भाषण लिहितात. उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे रहिवासी असलेले संदीप सिंह 2017मध्ये राहुल गांधी यांच्या टीममध्ये सहभागी झाले. संदीप सिंह हे राजनितीकार नाहीत. पण, राहुल गांधी यांचं भाषण लिहिण्यापासून ते प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील एन्ट्रीमध्ये देखील संदीप सिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. दरम्यान, राहुल गांधी संदीप सिंह यांच्यावर का विश्वास दाखवतात याबाबत ठोस अशी माहिती कुणालाही नाही.
सोनिया गांधींच्या पराभवासाठी भाजप 'या' खासदाराला मैदानात उतरवणार?
कोण आहेत संदीप सिंह
संदीप सिंह हे उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे रहिवासी आहेत. इलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी डिग्रीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर संदीप सिंह जेएनयुमध्ये पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांचा संबंध भाकपच्या विद्यार्थी शाखेशी आला. दरम्यान, 2005मध्ये संदीप सिंह यांनी तत्कालीन पंतप्रधान मनोहन सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यानंतर ते 2007मध्ये संदीप सिंह यांची विद्यार्थी नेतेपदी निवड झाली. तसेच आण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनामध्ये देखील संदीप सिंह सहभागी झाले. पण, कालांतरानंतर संदीप सिंह हे भाषण लेखक म्हणून काँग्रेसशी जोडले गेले. सध्या अशी देखील माहिती आहे की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा कॉर्पोरेटला विरोध आणि गरिबांना पाठिंबा या रणनितीमागे संदीप सिंह हेच आहेत.
SPECIAL REPORT: लोकसभेचा अचूक अंदाज वर्तवा; 21 लाख रुपये मिळवा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Priyanka gandhi, Rahul gandhi