अडवण्याची कोणाची हिम्मत ? मोदींचे मंत्री अधिकाऱ्यांवर भडकले

अडवण्याची कोणाची हिम्मत ? मोदींचे मंत्री अधिकाऱ्यांवर भडकले

आचारसंहितेच्या नियमाचा भंग होत असल्याने अधिकाऱ्यांनी अडवल्या गाड्या, मंत्री म्हणतात म्हणतात आदेश दिला कोणी?

  • Share this:

बक्सर, 31 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांच्या प्रचारावर आणि खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. कोणी आचारसंहितेचा भंग करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासही आयोग तयार आहे.

आता आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि अधिकाऱ्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अश्विनीकुमार चौबे यांच्या गाड्यांचा ताफा बक्सरचे एसडीए उपाध्याय यांनी थांबवला. आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होत असून अधिक गाड्या असल्याबाबत अधिकाऱ्यांनी विचारले. तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री असलेल्या अश्विनीकुमार चौबे यांना भाजपने सलग दुसऱ्यांदा तिकीट दिलं आहे. अश्विनीकुमार चौबे आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यात अधिकारी चौबे यांना आचारसंहितेचा भंग होत असल्याबद्दल सांगताना दिसतात. मात्र त्यावर असा आदेश कुणी दिला अशी उलट विचारणा केंद्रीय मंत्र्यांनी केल्याचे दिसते.

व्हिडीओत अधिकारी समजावणीच्या सुरात बोलताना दिसत असून भडकलेले मंत्री अश्विनीकुमार चौबे काहीच ऐकत नाहीत. त्यांनी कुणाचा आदेश आहे, मला तुरुंगात पाठवा असेही म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 31, 2019, 11:32 AM IST

ताज्या बातम्या