• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आता आझम खान, मनेका गांधींवर ही कारवाई

आता आझम खान, मनेका गांधींवर ही कारवाई

वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं मनेका गांधी आणि आझम खान यांच्यावर देखील टीका केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगानं कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि आझाम खान यांच्यावर देखील कारवाई केली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या आदेशानुसार आता मनेका गांधी यांना 48 तास तर आझम खान यांच्यावर 72 तासांचा प्रचारबंदी करण्यात आली आहे. 16 एप्रिल सकाळी 10 वाजल्यापासून हा आदेशाची अंंमलबजावणी केली जाणार आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांना 72 तास तर, मायावती यांच्यावर 48 तास प्रचारबंदी घालण्यात आलेली आहे. काय म्हणाल्या होत्या मनेका गांधी? 12 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे पार पडलेल्या प्रचार सभेत मनेका गांधी यांनी मुस्लिमांना उद्देशून अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केलं होतं. '' मी जिंकणार तर आहेच. पण मुस्लिमांनी मला मत दिलं नाही, आणि नंतर ते माझ्याकडे काम मागायला आले, तर स्वाभाविक आहे मी विचार करते, की यांना नोकरी देऊन काय उपयोग'', असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर ''निवडणूक ही शेवटी सौदेबाजीच असते. आज मला तुमची गरज आहे, उद्या तुम्हाला माझी गरज लागेल'', असंही त्या म्हणाल्या होत्या. वादग्रस्त वक्तव्यानंतरही समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याची माफी नाही आझम खान यांचं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशात रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. आझम खान यांनी यावेळी अर्वाच्च शब्दांत जयाप्रदांवर टीका केली होती. चित्रपट अभिनेत्री आणि भाजप उमेदवार जयाप्रदांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रामपूरमध्ये भाजप उमेदवार जयाप्रदा विरूद्ध समाजवादी पक्षाचे आझम खान अशी लढत असणार आहे. काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने घेत योगी आदित्यनाथ यांना नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर आता त्यांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. VIDEO: आझम खान यांच्या 'खाकी अंडरवेअर' वक्तव्यावर काय म्हणाले रामदास आठवले? काय म्हणाल्या होत्या मायावती बसपाच्या नेत्या मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर आणि बरेली जिल्ह्यात मुस्लीम मतदारांना आवाहन केलं होतं. मतांचं विभाजन होण्यापासून सावध राहा, असा इशाराच त्यांनी दिला होता. यानंतर, आपण हे वक्तव्य बहुजन समाजाला उद्देशून केलं, मुस्लिमांना नाही, अशी सारवासारव मायावतींनी केली. VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!
  First published: