विराट विजयानंतर नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

एनडीएने देशात मोठं यश मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी बसणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 02:15 PM IST

विराट विजयानंतर नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

नवी दिल्ली, 24 मे : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात मोठं यश मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी बसणार आहेत. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी नरेंद्र मोदी 28 मे रोजी आपल्या वारणसी मतदारसंघात जाणार आहे. या मतदारसंघातून नरेंद्र मोदींनी पुन्हा मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे वाराणसीतील जनतेचं आभार मानण्यासाठी मोदी तिथं जाणार आहेत.

मोदी-शहा अडवाणींच्या भेटीला

नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. या नेत्यांमधी मतभेदांच्या बातम्या सतत समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.

दरम्यान, देशाच्या राजकारणात जेव्हा नरेंद्र मोदींनी पाऊल टाकले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळी ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. 2014 मध्ये भाजपने प्रथम स्वबळावर सत्ता स्थापन केली. आता 2019 मध्ये मोदी त्सुनामीमध्ये पुन्हा एकदा भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मोदींचा 2019 मधील हा विजय इतका मोठा आहे की अशी कामगिरी 1984 मध्ये राजीव गांधींना देखील करता आली नाही.

Loading...

लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. यंदांच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर 300 जागांचा आकडा पार केला आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता 2019मध्ये मोदी त्सुनामीत भाजप मोठा विजय मिळवला आहे.


SPECIAL REPORT: मोदींच्या विजयामागे महत्त्वाच्या आहेत या 10 गोष्टी!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...