Elec-widget

निवडणूक निकालांची अमेरिकेतही उत्सुकता, अनिवासी भारतीयांनी केली जय्यत तयारी !

निवडणूक निकालांची अमेरिकेतही उत्सुकता, अनिवासी भारतीयांनी केली जय्यत तयारी !

अमेरिकेत बोस्टन, न्यूयॉर्क, शिकागो अशा मोठ्या शहरांमध्ये भारतीयांनी मोठे हॉल्स बुक केले असून तिथे भारतीय वाहिन्यांचं प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क 22 मे : सर्व देशभर सध्या फक्त एकच उत्सुकता आहे ती म्हणजे 23 मे रोजी लागणाऱ्या निकालांची. काय असतील निकाल कोण मारणार बाजी? नरेंद्र मोदींना पुन्हा संधी मिळणार का? एक्झिट पोल प्रमाणे निकाल लागतील की वेगळं काही होईल. काँग्रेसला किती जागा मिळतील. महाआघाडीचं काय होणार असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. ही उत्सुकता फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहे. अमेरिकेतही निकाल पाहण्यासाठी अनिवासी भारतीयांनी जय्यत तयारी केली आहे.

अमेरिकेत सर्वात जास्त भारतीय राहतात. त्याच बरोबरअनेक पक्षांच्या तिथे शाखाही आहेत. त्यांना तिथे फ्रेंड्स ऑफ बीजेपी, फ्रेंड्स ऑफ काँग्रेस असं म्हटलं जातं. 2014 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विदेश दौऱ्यांमध्ये तिथल्या भारतीयांशी संवाद साधला होता. त्यामुळे मोदींबद्दल तिथल्या भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

अमेरिकेत बोस्टन, न्यूयॉर्क, शिकागो अशा मोठ्या शहरांमध्ये भारतीयांनी मोठे हॉल्स बुक केले असून तिथे भारतीय वाहिन्यांचं प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे. अनेकांनी सुट्ट्याही घेतल्या असून सर्व दिवसभर निकाल पाहण्याचं नियोजन तिथे करण्यात आलं आहे.

एक्झिट पोलमध्ये NDAची सत्ता

देशातील विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यात काही राज्यात भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. 2014च्या प्रमाणेच यंदा देखील मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये भाजपला मोठे यश मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

Loading...

आज तक या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोल नुसार मध्य प्रदेशमधील 29 जागांपैकी भाजपला 26-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 1-3 जागा मिळू शकतील. छत्तीसगडमध्ये 11 जागांपैकी भाजपला 7-8 जागा तर काँग्रेसला 3-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या राज्यात बसपाला एकही जागा मिळत नसल्याचा अंदाज आहे.

राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांपैकी 23-25 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 2014 प्रमाणेच भाजपला पुन्हा एकदा राजस्थान घवघवीत यश मिळणार आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजप-सेनेला 38-42 जागा तर आघाडीला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...