सर्वात मोठी बातमी; पराभवानंतर राहुल गांधींनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव

सर्वात मोठी बातमी; पराभवानंतर राहुल गांधींनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव

सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीच्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे: सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीच्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याची प्रस्ताव दिल्याचे बोलून दाखवले आहे.

वाचा- नेहरु, इंदिरा गांधींना जमले नाही, मोदींनी केला हा विक्रम!

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील काँग्रेसने केवळ 44 जागांवर विजय मिळवला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केल्यानंतर देखील काँग्रेसला फार काही हाती लागले नाही. लोकसभेच्या 542 जागांपैकी काँग्रेस केवळ 50 जागांवर आघाडीवर आहे.

लाव रे ते फाटके; उद्धव ठाकरेंचा राजना पहिल्यांदाच जोरदार टोला

या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी PM मोदी आणि भाजपचे अभिनंदन केले. तसेच जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. अमेठीतून स्मृती इराणी यांच्या विजयाबद्दल देखील त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमेठीच्या मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. देशाच्या जनतेने त्यांचा निर्णय स्पष्टपणे दिला आहे, असे ही ते म्हणाले. राहुल गांधींच्या पाठोपाठ प्रियांका गांधी यांनी देखील मोदी व भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!

First published: May 23, 2019, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading