BREAKING : मला मुख्यमंत्रिपदी राहायचं नाही : ममता बॅनर्जी; केली राजीनाम्याची तयारी

BREAKING : मला मुख्यमंत्रिपदी राहायचं नाही : ममता बॅनर्जी; केली राजीनाम्याची तयारी

'मला मुख्यमंत्रिपदी राहायचं नाही. मला जनतेत जाऊन काम करायचं आहे', असं सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे.

  • Share this:

कोलकाता, 25 मे : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतकं यश मिळालं नाही आणि मुख्य म्हणजे भाजपला रोखता आलं नाही. त्यामुळे 'मला मुख्यमंत्रिपदी राहायचं नाही. मला जनतेत जाऊन काम करायचं आहे', असं सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे.

लोकसभेच्या एकूण 42 जागांपैकी 18 जागा भाजपला मिळाल्या तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. 2014  पेक्षा 12 जागा तृणमूलला कमी मिळाल्या. भाजपने गेल्या निवडणुकीत फक्त 2 जागा मिळवल्या होत्या. त्यांनी मुसंडी मारत ममतांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू होती. आता निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जिव्हारी लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत ममता बॅनर्जींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

बंगाली राजकारणात ऐतिहासिक ठरू शकेल अशी 2019 ची लोकसभेची निवडणूक या राज्याबरोबर देशाचा कौलही ठरवेल असं म्हटलं जात होतं. बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी या राज्यावर चांगला जम बसवला असतानाच आता भाजपच्या वारूने बंगालमध्ये प्रवेश केला. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. ममता विरुद्ध मोदी असा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगला.

निकालानंतर भाजपने ममतांच्या राज्याला सुरुंग लावल्याचं स्पष्ट झालं.

पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट्स आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.

मा, माटी, मानुष असं सांगत डाव्यांना धूर चारणाऱ्या ममता बॅनर्जी जवळपास दशकभरापासून बंगालवर प्रभुत्व गाजवलं. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठा मैलाचा दगड ठरणारी असेल.

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती. मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. आता 2019 च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.

(बातमी अपडेट होत आहे.)

VIDEO : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मानाचे पान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या