भाजपला किती जागा, फक्त इथे आहे अधिकृत आकडेवारी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 05:37 PM IST

भाजपला किती जागा, फक्त इथे आहे अधिकृत आकडेवारी

नवी दिल्ली, 23 मे:  लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाजपने 303 जागांवर आघाडी घेतली आहे. तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे.

हे देखील वाचा-

वाचा- लोकसभा निवडणूक 2019: धक्कादायक, महाराष्ट्रातील 'हे' 6 दिग्गज नेते पिछाडीवरLoading...


निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आयोगने दिलेल्या माहितीनुसार 5 वाजेपर्यंत भाजपने 303 आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. या दोन्ही पक्षानंतर शिवसेनाने 18 जागांवर आघाडी घेतली आहे.

असे आहेत कल

भाजप-303

काँग्रेस- 50

शिवसेना-18

वायएसआर काँग्रेस- 22

डीएमके- 23

तृणमूल काँग्रेस- 22

बसपा-10


543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी 11 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील 95 जागांवर 18 एप्रिल रोजी, 23 एप्रिल रोजी 15 राज्यातील 117 मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 9 राज्यातील 71 जागांवर, 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघात, सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी 7 राज्यात 59 जागांवर तर अखेरच्या टप्प्यात 19 मे रोजी 8 राज्यातील 59 मतदारसंघात मतदान झाले होते.


VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...