लोकसभा निवडणूक निकाल: मुंबईकर देखील मोदी लाटेत सहभागी, सर्व जागांवर युतीची आघाडी!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा युती बाजी मारत असल्याचे चित्र आहे. मुंबईत लोकसभेच्या 6 जागा आहेत. या सर्व जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  • Share this:

उत्तर मुंबईतून भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने शेट्टींच्या विरुद्ध अभिनेत्री  उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पिछाडीवर आहेत.

ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातून भाजपचे मनोज कोटक आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या विरोधानंतर भाजपने येथून विद्यमान खासदार किरिट सोमय्या यांची उमेदवारी नाकारली होती.

उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे गजाजन कीर्तिकर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे संजय निरुपम पिछाडीवर आहेत

दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष मिलिंद देवरा पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे.

शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी दक्षिण मध्य मुंबईतून आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड पिछाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या