लोकसभा निवडणूक कल- मोदींच्या नेतृत्वाखाली NDAला मोठी आघाडी

लोकसभा निवडणूक कल- मोदींच्या नेतृत्वाखाली NDAला मोठी आघाडी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आज देशातील जनतेने कोणाला पुढील पाच वर्ष सत्ता दिली आहे हे स्पष्ट होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आज देशातील जनतेने कोणाला पुढील पाच वर्ष सत्ता दिली आहे हे स्पष्ट होणार आहे. 2014प्रमाणे भाजप पुन्हा सत्ते येणार का की काँग्रेसला अच्छे दिन येणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी 11 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील 95 जागांवर 18 एप्रिल रोजी, 23 एप्रिल रोजी 15 राज्यातील 117 मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 9 राज्यातील 71 जागांवर, 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघात, सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी 7 राज्यात 59 जागांवर तर अखेरच्या टप्प्यात 19 मे रोजी 8 राज्यातील 59 मतदारसंघात मतदान झाले होते.

LIVE UPDATE

- देशातील पहिला कल हाती, भाजपला 21 जागांवर आघाडी

- महाराष्ट्रातून शिवसेनेने एका जागेवर घेतली आघाडी

- केरळमधील तिरुवनंतपूरममधून भाजपने घेतली आघाडी

- सुरुवातीचे कल- काँग्रेसला 12 जागांचे नुकसान

- राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर

- आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर आघाडीवर

 

First published: May 23, 2019, 8:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading