पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली
10:35 (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी होण्याआधी वाराणसीला जाणार
10:28 (IST)
नवी दिल्ली- 30 मे रोजी नरेंद्र मोदींचा होणार शपथविधी होणार, सूत्रांची माहिती
10:27 (IST)
भाजपच्या विजयानंतर नरेंद्र मोदी गेले लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला
18:4 (IST)
अबुधाबीचे राजे शेख महोम्मद बिन यांनी केले मोदींचे अभिनंदन
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने 303 जागांवर ऐतिहासिक असा विजय मिळवला. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 352 जागा मिळाल्या. 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यंदा मोदी त्सुनामीत त्यांना 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे.देशातील जनतेने 1984नंतर प्रथमच एका पक्षाला इतके मोठे यश दिले आहे. या विजयानंतर मोदींनी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी मोदींचा शपथविधी होणार आहे. त्याआधी ते वाराणसी मतदारसंघात जाऊन जनतेचे आभार माननार आहेत असे कळते.