Analysis : या कारणांमुळे झाला सोलापूरात पुन्हा भाजपचा विजय!

Analysis : या कारणांमुळे झाला सोलापूरात पुन्हा भाजपचा विजय!

महाराष्ट्रात वंचित आघाडीमुळे निवडणुकीत रंगत आली. याची सगळ्यात जास्त धास्ती काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटत होती. त्याचे परिणाम आता स्पष्ट दिसत आहेत.

  • Share this:

सोलापूर 23 मे : महाराष्ट्रात सर्वांच लक्ष लागलेल्या सोलापूर मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पराभवाच्या छायेत आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर 1 लाख 41 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात आधी सोलापुरातून लढण्याची घोषणा केली होती. वंचित बहुजन आघाडीमुळे त्याची सर्वात जास्त चर्चा झाली. दलित आणि मागासवर्गीय मतदार हे वंचितकडे वळतील असं म्हटलं जात होतं. प्रकाश आंबेडकरांना प्रतिसादही उत्तम होता. मात्र ते विजयात परावर्तीत होऊ शकलं नाही.

हा मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसला असल्याने त्याचा फटका काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना बसला. वंचित आघाडी हे मतविभाजन करणारी आघाडी आहे असं म्हटलं जात होता. ते आता दिसून येत आहे.

त्यातच भाजपने लिंगायत समाजेचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना तिकीट देण्याची खेळी खेळली. या मतदारसंघात लिंगायत समाजाचंही चांगलं प्राबल्य आहे. त्यातच भाजपची पारंपरिक मतं फुटली नाहीत.

मोदींची झालेली सभा, बालाकोटच्या हल्ल्यानंतर बदललेली स्थिती, राष्ट्रवाद आणि मोदींकडे आकृष्ट झालेला नवमतदार याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला त्यामुळे सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांचं पुन्हा खासदार होण्याचं स्वप्न भंगलं.

अकोल्यातही वंचितचा फटका

अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला समजला जातो. या जागेवर ते 1999 मध्ये निवडूनही आले होते. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेलीय. 2014 च्या मोदी फॅक्टरने जाती-पातीची गणितं आणि व्होट बँकेचं राजकारण पार बदलवून टाकलं. त्याचा जोरदार फटका प्रकाश आंबेडकरांना बसलाय.

त्याचबरोबर त्यांनी सोलापूरातूनही निवडणूक लढविल्याने ते पूर्णवेळ अकोल्यावर लक्ष ठेवू शकले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या