Analysis : नाशिकमध्ये भुजबळ फॅक्टर का अपयशी ठरला?

Analysis : नाशिकमध्ये भुजबळ फॅक्टर का अपयशी ठरला?

तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर भाजपने छगन भुजबळांची पद्धतशीर कोंडी केली. त्यामुळे त्यांचा प्रभाव वाढला नाही.

  • Share this:

प्रशांत बाग नाशिक 23 मे : उत्तर महाराष्ट्रातील सर्व 8 जागा राखण्यात युतीला यश आलं. एकूण 8 जागांपैकी भाजपने 6 तर शिवसेना दोन जागा जिंकणार आहे. या सर्व नियोजनात  गिरीश महाजन जायंट किलर ठरले. या आठही जागांची महाजन यांच्यावर होती जबाबदारी होती.

त्यातल्या 3 विद्यमान भाजप खासदारांना नाकारून पक्षाने नवख्यांना तिकीट दिलं होतं. भाजपच्या यशाची ही 10 कारणं आहेत.

1)  उत्तम नियोजन : या सर्व जागांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्यावर टाकली होती. महाजनांनी प्रत्येक मतदारसंघाचा सखोल अभ्यास करून उत्तम टीम बांधली आणि तीन महिने उत्तम काम केलं. त्याचे परिणाम निकालाच्या रुपात बघायला मिळाले.

2) नाराजी दूर करण्यात यश : उत्तर महाराष्ट्रातल्या काही खासदारांविरुद्ध नाराजीची भावना होती. ही नाराजी लक्षात आल्याने पक्षाने तीन खासदारांची तिकीटं कापली. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचं काम महाजनांना करावं लागलं. ते ऑपरेशन त्यांनी यशस्वी पार पाडलं.

3)  विखे फॅक्टर :  यातल्या नगर आणि शिर्डी या मतदारसंघात काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. पडद्याआड राहुल त्यांनी तन-मन-धनाने सुजय विखे पाटील यांच्यासोबतच इतर उमेदवारांचीही मदत केली.

4) भुजबळांची ताकद संपली : ऐकेकाळी नाशिक हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. पण तुरुंगात गेल्यानंतर त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं विस्तारलं. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते होऊ शकलं नाही. भाजपने त्यांची पद्धतशीर कोंडी केली.

5) फडणवीसांचं लक्ष : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रात चांगलं लक्ष घातलं होतं. एकनाथ खडसे यांची नाराजी असूनही महाजनांनी तिथे आपला प्रभाव कायम ठेवला. तर नाशिक मी दत्तक घेतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगत नीधीही दिला. महापालिकांच्या निवडणुकीतही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालत अनिल गोटेंच बंड मोडून काढलं त्यामुळे ते वेगळे होऊनही त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या