पवारांच्या राष्ट्रवादीची पॉवर इतक्या दूरही चालली; काँग्रेसच्या विरोधातच निवडून आला उमेदवार

पवारांच्या राष्ट्रवादीची पॉवर इतक्या दूरही चालली; काँग्रेसच्या विरोधातच निवडून आला उमेदवार

भारताच्या एका टोकाला असलेल्या केंद्रशासित प्रदेशातल्या मतदारसंघात लक्षद्वीप बेटांवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे, तेही सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीला इथून यश मिळालं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, राष्ट्रवादीने महाराष्ट्रात 4 जागा जिंकल्या आहेत, पण राज्याबाहेरही शरद पवारांच्या या पक्षाची पॉवर या एका ठिकाणी चालली. भारताच्या एका टोकाला असलेल्या केंद्रशासित प्रदेशातल्या मतदारसंघात लक्षद्वीप बेटांवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे, तेही सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीला इथून यश मिळालं आहे.

लक्षद्वीप मतदारसंघातून खासदार मोहम्मद फैजल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली होती. तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरचे एकमेव खासदार आहेत.

2014 ला मोहम्मद फैजल लक्षद्वीपमधून पहिल्यांदाच निवडून आले होते. मोदी लाटेतही ते निवडून आले हे विशेष.

लक्षद्वीप बेटांचा समावेश असलेला हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. गेली कित्येक वर्षं या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचा हा मतदारसंघ. सईद या जागेवरून सलग 10 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 2004 मध्ये पहिल्यांदाच त्यांच्या विजयरथाला संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराने रोखलं. त्यानंतर सईद यांचं 2005 मध्ये निधन झालं आणि लक्षद्वीपची जागा 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सईद यांचे पुत्र मोहम्मद हमीदुल्ला सईद यांनी लढवली आणि जिंकलीही. ते त्यावेळचे सर्वात तरुण खासदार ठरले होते. पण हमीदुल्ला सईद आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला गेल्या निवडणुकीत शह दिला तो मोहम्मद फैजल यांनी.

औरंगाबादेत इम्तियाज जलील विजयी, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना मारक ठरला 'जावई' फॅक्टर

VIDEO : विजयानंतर साध्वींची पहिली प्रतिक्रिया

पराभवाचा दणका बसलेल्या महाराष्ट्राच्या या 8 राजकीय नेत्यांचं आता काय होणार?

मोहम्मद फैजल हे लक्षद्वीप भागातले सध्या लोकप्रिय राजकारणी समजले जातात. राष्ट्रवादीचे असूनदेखील त्यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या विकास कामांचं कौतुक केलं होतं. या सरकारच्या काळात लक्षद्वीपसारख्या केंद्रशासित प्रदेशात बराच विकास झाल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्याची विशेष दखल घेण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष असला, तरी शरद पवारांच्या या पक्षाची व्याप्ती राज्याबाहेरही आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 5 आणि राज्याबाहेरचे 2 धरून राष्ट्रवादीचे केवळ 7 खासदार निवडून आले होते. त्यातल्या तारिक अन्वर यांनीसुद्धा आता पक्ष सोडला. त्यामुळे लोकसभेतलं राष्ट्रवादीचं संख्याबळ फक्त 6 होतं. या वेळी ते आणखी एकानं खाली यायची शक्यता आहे.

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 09:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading