मोदींचे 16 मे 2014चे ट्विट पुन्हा व्हायरल, आज काय बोलणार!

मोदींचे 16 मे 2014चे ट्विट पुन्हा व्हायरल, आज काय बोलणार!

भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांची नजर आता मोदीवर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंतचे कल पाहता मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने 300चा आकडा पार केला आहे. तर भाजपने एकट्याने 290ही फिगर गाठली आहे. एक्झिट पोलने देखील अशा प्रकारचा निकाल अंदाज वर्तवला होता. भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांची नजर आता मोदीवर आहे. 2019मधील या विजयाबद्दल मोदींनी 2014मध्येच भाकित केले होते.

वाचा- लोकसभा निवडणूक 2019 : बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

2014मध्ये भाजपने जेव्हा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता तेव्हा मोदींनी दुपारी 12च्या सुमारास एक ट्वीट केले होते. मोदींच्या या ट्विटमध्येच त्यांनी 2019च्या विजयाचे भाकित केले होते. त्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले होते की, ‘India has won! भारत की विजय, अच्छे दिन आने वाले हैं’.

मोदींचा हा ट्विट देखील ऐतिहासिक ठरला होता. हा ट्विट नेटिझन्सनी 1 लाखहून अधिक वेळा रिट्विट केले होते. तर 85 हजार वेळा लाईक करण्यात आले होते. आतापर्यंत आलेल्या कौल पाहता सर्वजण या प्रतिक्षेत आहे की मोदी आज मिळालेल्या विजयाबद्दल काय बोलतात. अर्थात मोदी सुरुवातीचे कल सुरु असताना ट्विट करतात की संपूर्ण निकाल आल्यावर प्रतिक्रिया देतात यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'

First published: May 23, 2019, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading