मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदींच्या ऐतिहासिक विजयात 'या' राज्यांनी दिला धक्कादायक निकाल!

मोदींच्या ऐतिहासिक विजयात 'या' राज्यांनी दिला धक्कादायक निकाल!

2018च्या विधानसभेचा निकाल पाहिल्यास कोणालाही वाटणार नाही या राज्यात भाजपला यश मिळेल. पण...

2018च्या विधानसभेचा निकाल पाहिल्यास कोणालाही वाटणार नाही या राज्यात भाजपला यश मिळेल. पण...

2018च्या विधानसभेचा निकाल पाहिल्यास कोणालाही वाटणार नाही या राज्यात भाजपला यश मिळेल. पण...

नवी दिल्ली, 23 मे: लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवला. सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसेल अशी चर्चा होती. डिसेंबर 2018मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन महत्त्वाच्या राज्यातील सत्ता गमावली होती. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 तर मध्य प्रदेशमध्ये 29 जागा आहेत. त्याच बरोबर गुजरात विधानसभेत भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या. विधानसभेत जनतेने भाजपला नाकारल्यामुळे त्याचा फटका लोकसभेत बसेल असे वाटत होते. प्रत्यक्षात या दोन्ही राज्यांनी मोदींना मोठा आधार दिला आहे. VIDEO : सेनेच्या वाघाने पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची रोखली वाट, अजितदादांना दिलं हे चॅलेंज लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधक एकत्र आले होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा कमी होणार हे ग्रहीत होते. अशात राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये देखील त्यांना फटका बसेल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात ही दोन्ही राज्य 2014 प्रमाणे पुन्हा एकदा मोदींच्या पाठिशी उभी राहिली. मध्य प्रदेशमधील 29 पैकी 28 जागांवर भाजपने सकाळपासून आघाडी घेतली आहे. केवळ एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा छिदंवाडामधून आघाडीवर आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला होता. विधानसभेच्या 200 जागांपैकी भाजपला 79 जागा मिळाल्या होत्या. विधानसभेत भाजपच्या 90 जागा कमी झाल्या होत्या. तर काँग्रेसच्या 79ने वाढल्या होत्या. पण 2019च्या लोकसभेत देखील पुन्हा एकदा राजस्थानच्या जनतेने भाजपला 2014सारखेच यश मिळवून दिले आहे. कर्नाटकमध्ये देखील भाजपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. राज्यात जेडीएस आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे भाजपचा पराभव झाला होता. लोकसभेसाठी देखील हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे या आघाडीचा फटका भाजपला बसेल अशी चर्चा होती. राज्यातील 28 पैकी 24 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस आघाडीला केवळ 3 जागांवर आघाडी मिळाली आहे. 2014पेक्षा भाजपच्या जागा 7ने वाढल्या आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थान बरोबरच गुजरातमध्ये देखील सर्व 25 जागांवर भाजप आघाडीवर आहे. VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'
First published:

Tags: Election 2019, Lok sabha election 2019

पुढील बातम्या