अमेठीत राहुल गांधी 7 हजार 600 मतांनी पिछाडीवर,काँग्रेसला सर्वात मोठा धक्का

अमेठी हा काँग्रेसचा गड आहे. या आधी राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र राहुल गांधी पराभवाच्या छायेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:57 AM IST

अमेठीत राहुल गांधी 7 हजार 600 मतांनी पिछाडीवर,काँग्रेसला सर्वात मोठा धक्का

अमेठी 23 मे : देशभर काँग्रेसची पिछेहाट होत असताना काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीत 7 हजार 600 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी या आघाडीवर आहेत. वायनाडमध्ये मात्र राहुल गांधी 40 हजार मतांनी आघाडीवर आहे.

अमेठी हा काँग्रेसचा गड आहे. या आधी राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014च्या निवडणुकीत स्मृती इराणींचा पराभव झाला होता. त्यानंतर स्मृती इराणींनी तिथे वारंवार भेटी देऊन आपला जम बसवला. या ठिकाणी पराभवाची भिती वाटत असल्यानेच राहुल गांधी यांनी केरळमधल्या वायनाडमधून निवडणुक लढवली अशी टीका भाजपने केली होती.

देशभर काँग्रेसला धक्का बसत असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या राहुल गांधीच्या भेटीला गेल्या. त्यांनी राहुल यांच्यासोबत निकालांबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देशभर काँग्रेसची पिछेहाट सुरू असून महाराष्ट्रात काँग्रेस आपलं खातंही उघडू शकणार नाही अशी स्थिती आहे.



Loading...

2014मध्ये भाजपची कामगिरी

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा जवळपास दुप्पट होती. ३६ टक्के लोकांनी मोदींना तर काँग्रेसच्या या तीन दिग्गज नेत्यांना १९ टक्के लोकांनी पसंती दिली.

भाजपने २०१४ मध्ये जिंकलेल्या २८२ जागांपैकी १३७ जागांमध्ये अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती.

१६९ जागांमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित टक्केवारीपेक्षा जास्त आहे.

चार पैकी तीन जागांवर (७३ टक्के) भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली आघाडी ही एक लाखांपेक्षा जास्त मतांची आहे. पाच पैकी तीन ठिकाणी भाजपने काँग्रेसला हरवलंय.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर भाजपला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली मतांची टक्केवारी ही काँग्रेसपेक्षा जास्त होती. वाजपेयी पंतप्रधान असताना झालेल्या निवडणुकांमध्येही मिळालेल्या मतांचं प्रमाण हे भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त होते.

२००९ च्या निवडणुकीपासून फक्त पंजाब या राज्यातच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी झाली. तर सर्वाधिक वाढ उत्तर प्रदेशात झाली. २०१४ मध्ये भाजपला २४.८ टक्के एवढी मतं मिळाली.

सहा राज्यांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी भाजपला अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती. गुजरात, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा आणि हिमाचल प्रदेश ही ती राज्य आहेत.

गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गोवा या सहा राज्यांमध्ये भाजपला सर्व जागा मिळाल्या होत्या.

भाजपने शहरी भागांमध्ये दोन तृतीयांश ५७ पैकी ३७ तर ग्रामीण भागातल्या अर्ध्याहून जास्त ३४२ पैकी १७८ जागा जिंकल्या होत्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...