भाजप आणि NDAच्या ऐतिहासिक विजयावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

भाजप आणि NDAच्या ऐतिहासिक विजयावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया : सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत

  • Share this:

नवी दिल्ली 23 मे : लोकसभेत भाजप आणि NDAच्या ऐतिहासिक विजयावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. विरोधी पक्षांनी केलेला दुष्प्रचार, खोटे-व्यक्तिगत आरोप आणि आधारहीन राजकारण यांच्या विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या आणि राष्ट्रवादाच्या राजकाणाला लोकांनी कौल दिला आहे असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात येणार असून कार्यकर्त्यांशी बोलण्याची शक्यता आहे.शपथविधीची तयारी सुरू

लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि NDAला ऐतिहासिक बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला स्वबळावर 300 तर NDAला 350 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014पेक्षाही जास्त जागा भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. 23 मे रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता असून त्यात मोदींची नेतेपदी निवड होईल. त्यानंतर 28 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.28 मे रोजी स्वातंत्रवीर सावरकारांची जयंती आहे. तो मुहूर्त साधून शपधविधीची तारिख भाजपचे नेते काढण्याची शक्यता आहे. भाजपला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्याने भाजपचे रणनीतीकार शपथविधी समारंभाच्या तयारीला लागले आहेत. या समारंभाला विदेशातले बडे पाहुणे निमंत्रित करण्याचीही भाजपची योजना आहे. एखाद्या मुस्लिम देशाच्या प्रमुखालाही निमंत्रित केलं जाऊ शकते अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.2014मध्ये जेव्हा मोदींनी शपथ घेतली त्या समासंभाला सार्क देशांच्या प्रमुखांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक समजला जात होता. याही वेळी अशाच प्रकारचे काहीतरी भव्यदिव्य व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 26 मे ला रविवार असून त्या दिवशी पंतप्रधान मोदी आपल्या मन की बातची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या