लोकसभेच्या पहिल्या दोन जागांचा निकाल जाहीर, दोनही जागा भाजपच्या खात्यात

राजस्थान आणि गुजरातमध्ये भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 12:24 PM IST

लोकसभेच्या पहिल्या दोन जागांचा निकाल जाहीर, दोनही जागा भाजपच्या खात्यात

नवी दिल्ली 23 मे : लोकसभेच्या निवडणुकीत सर्व देशभरच भाजपला मोठी आघाडी आहे. पहिले दोन निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले असून त्या दोनही जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत. गुजरातच्या राजकोटमधून भाजपचे मोहन कुंदरिया विजयी झालेत. तर राजस्थानच्या भिलवाडामध्ये सुभाष बहेडिया यांनी विजय मिळवला. या दोनही ठिकाणी भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे.

देशभर भाजपची आगेकूच सुरू असताना भाजपच्या संसदीय मंडळाची सायंकाळी साडे पाच वाजता बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांशी मोदी बोलण्याचीही शक्यता आहे.

अमेठीत राहुल गांधी पिछाडीवर

देशभर काँग्रेसची पिछेहाट होत असताना काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीत 7 हजार 600 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी या आघाडीवर आहेत. वायनाडमध्ये मात्र राहुल गांधी 40 हजार मतांनी आघाडीवर आहे.

अमेठी हा काँग्रेसचा गड आहे. या आधी राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014च्या निवडणुकीत स्मृती इराणींचा पराभव झाला होता. त्यानंतर स्मृती इराणींनी तिथे वारंवार भेटी देऊन आपला जम बसवला. या ठिकाणी पराभवाची भिती वाटत असल्यानेच राहुल गांधी यांनी केरळमधल्या वायनाडमधून निवडणुक लढवली अशी टीका भाजपने केली होती.

Loading...

देशभर काँग्रेसला धक्का बसत असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या राहुल गांधीच्या भेटीला गेल्या. त्यांनी राहुल यांच्यासोबत निकालांबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देशभर काँग्रेसची पिछेहाट सुरू असून महाराष्ट्रात काँग्रेस आपलं खातंही उघडू शकणार नाही अशी स्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...