नरेंद्र मोदी या तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता!

नरेंद्र मोदी या तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता!

28 मे रोजी स्वातंत्रवीर सावरकारांची जयंती आहे. तो मुहूर्त साधून शपधविधीची तारिख भाजपचे नेते काढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 23 मे : लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि NDAला ऐतिहासिक बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला स्वबळावर 300 तर NDAला 350 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014पेक्षाही जास्त जागा भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. 23 मे रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता असून त्यात मोदींची नेतेपदी निवड होईल. त्यानंतर 28 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.

28 मे रोजी स्वातंत्रवीर सावरकारांची जयंती आहे. तो मुहूर्त साधून शपधविधीची तारिख भाजपचे नेते काढण्याची शक्यता आहे. भाजपला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्याने भाजपचे रणनीतीकार शपथविधी समारंभाच्या तयारीला लागले आहेत. या समारंभाला विदेशातले बडे पाहुणे निमंत्रित करण्याचीही भाजपची योजना आहे. एखाद्या मुस्लिम देशाच्या प्रमुखालाही निमंत्रित केलं जाऊ शकते अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

2014मध्ये जेव्हा मोदींनी शपथ घेतली त्या समासंभाला सार्क देशांच्या प्रमुखांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक समजला जात होता. याही वेळी अशाच प्रकारचे काहीतरी भव्यदिव्य व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 26 मे ला रविवार असून त्या दिवशी पंतप्रधान मोदी आपल्या मन की बातची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये भाजपची कामगिरी

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा जवळपास दुप्पट होती. ३६ टक्के लोकांनी मोदींना तर काँग्रेसच्या या तीन दिग्गज नेत्यांना १९ टक्के लोकांनी पसंती दिली.

भाजपने २०१४ मध्ये जिंकलेल्या २८२ जागांपैकी १३७ जागांमध्ये अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती.

१६९ जागांमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित टक्केवारीपेक्षा जास्त आहे.

चार पैकी तीन जागांवर (७३ टक्के) भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली आघाडी ही एक लाखांपेक्षा जास्त मतांची आहे. पाच पैकी तीन ठिकाणी भाजपने काँग्रेसला हरवलंय.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर भाजपला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली मतांची टक्केवारी ही काँग्रेसपेक्षा जास्त होती. वाजपेयी पंतप्रधान असताना झालेल्या निवडणुकांमध्येही मिळालेल्या मतांचं प्रमाण हे भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त होते.

२००९ च्या निवडणुकीपासून फक्त पंजाब या राज्यातच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी झाली. तर सर्वाधिक वाढ उत्तर प्रदेशात झाली. २०१४ मध्ये भाजपला २४.८ टक्के एवढी मतं मिळाली.

सहा राज्यांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी भाजपला अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती. गुजरात, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा आणि हिमाचल प्रदेश ही ती राज्य आहेत.

गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गोवा या सहा राज्यांमध्ये भाजपला सर्व जागा मिळाल्या होत्या.

भाजपने शहरी भागांमध्ये दोन तृतीयांश ५७ पैकी ३७ तर ग्रामीण भागातल्या अर्ध्याहून जास्त ३४२ पैकी १७८ जागा जिंकल्या होत्या.

पाचपैकी दोन मुस्लिमांनी काँग्रेसला मत दिलं तर उच्च जातींच्या हिंदूंमध्ये दोन पैकी एकाने भाजपला मत दिलं.

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या (१८ ते २२ वयोगट) ३६ टक्के तरुणांनी भाजपला मतदान केलं. तर काँग्रेसला केवळ १७ टक्के तरुणांनी मत दिलीत.

नऊ राज्यांमध्ये NDA ला ९० टक्क्यांहून जास्त तर सहा राज्यांमध्ये सर्व जागा मिळाल्या.

गुजरात २६/२६

राजस्थान २५/२५

दिल्ली ७/७

उत्तराखंड ५/५

हिमाचल प्रदेश ४/४

गोवा २/२

मध्य प्रदेश २७/२७

उत्तर प्रदेश ७३/८०

पंजाब ९/१०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 02:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading