'काऊंट डाऊन' सुरू, पंतप्रधान कोण? आज होणार फैसला

उत्तर प्रदेशात काय होणार? महाराष्ट्रात राज ठाकरेंचं कार्ड चालणार का? वंचित बहुजन आघाडीचा फटका कुणाला बसणार? काँग्रेस, राष्ट्रवादीचं काय होणार याची सगळी उत्तर आता काही तासांमध्ये मिळणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 09:16 AM IST

'काऊंट डाऊन' सुरू, पंतप्रधान कोण? आज होणार फैसला

नवी दिल्ली 23 मे : गेली दोन महिने सुरू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची आज सांगता होतेय. सगळ्या देशाला उत्सुकता आहे ती निकालांची. काय असतील निकाल, कोण मारणार बाजी? नरेंद्र मोदींना पुन्हा संधी मिळणार का? एक्झिट पोल प्रमाणे निकाल लागतील की वेगळं काही होईल? काँग्रेसला किती जागा मिळतील. महाआघाडीचं काय होणार? असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. ही उत्सुकता फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहे. अमेरिकेतही निकाल पाहण्यासाठी अनिवासी भारतीयांनी जय्यत तयारी केली आहे.

अशी होणार मतमोजणी?

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल आणि नंतर मशिन्स उघडल्या जाणार आहेत. व्हीव्हीपॅटमुळे मतमोजणीला थोडा उशीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र व्हीव्हीपॅटची पडताळणी ही सर्वात शेवटी होणार असल्याने फक्त औपचारिक घोषणा उशीरा होईल. त्याआधीचे सर्व कल कळणार आहेत. दुपारपर्यंत सर्व कल हाती येण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल्समध्ये भाजप आणि NDAला बहुमत मिळेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. मोदींची लाट या निवडणुकीतही आहे असंही बोललं जात आहे. त्यामुळे निकाल काय असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशात काय होणार? महाराष्ट्रात राज ठाकरेंचं कार्ड चालणार का? वंचित बहुजन आघाडीचा फटका कुणाला बसणार? काँग्रेस, राष्ट्रवादीचं काय होणार याची सगळी उत्तर आता काही तासांमध्ये मिळणार आहेत.

प्रशासन सज्ज

Loading...

राज्यातल्या 48 लोकसभा मतदार संघांच्या मतमोजणीसाठी 38 ठिकाणी मतमोजणी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमारे 1 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in  आणि https://results.eci.gov.in  संकेतस्थळावरही निकाल पाहण्यास मिळणार आहेत. त्याच बरोबर 1950 या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला असून  तिथेही 022-22040451 / 54 या क्रमांकावर माहिती मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 11:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...