लोकसभा निवडणूक निकाल LIVE : तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांना यश, मोदींची जादू नाही

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांना यश, मोदींची जादू नाही

तेलंगणामधल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला यश मिळालं आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इथे झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे.

  • Share this:

हैदराबाद, 23 मे : तेलंगणामधल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला यश मिळालं आहे. तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला 11 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत TRS च्या जागा वाढल्या आहेत.चंद्रशेखर राव हे देशाच्या राजकारणात आणि सरकारस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलतील, अशी चर्चा होती. त्यासाठी चंद्रशेखर राव यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याच्याही बातम्या होत्या. पण आता देशात एनडीएचं सरकार येणार असल्यामुळे या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे.

पहिली लोकसभा निवडणूक

तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इथे झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. तेलंगणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये TRSची ताकद वाढताना दिसत आहे. 1999मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी टीडीपीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नव्हतं. के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचं उपसभापतीपद चंद्रबाबू नायडू यांनी दिलं होतं. त्यानंतर एका वर्षानंतर के. चंद्रशेखर राव यांनी टीडीपीशी फारकत घेत तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली.

2004 मध्ये 5 जागा

2004मध्ये TRSला पाच जागांवरती विजय मिळाला होता. त्यानंतर त्यांना UPAमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. 2009मध्ये निकालांच्या पूर्वी त्यांनी NDAचा हात धरला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण, TRSला केवळ 2 जागी विजय मिळाला. तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अगदी कमी जागा मिळतील, असा होता. त्याप्रमाणेच चंद्रशेखर राव यांनी राज्यात चांगलीच आघाडी घेतली.

====================================================================================

VIDEO : 'राज ठाकरेंवर करमवणूक कर लावला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading