लोकसभा निवडणूक निकाल LIVE : तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसची मुसंडी

तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे तर जयललितांचा अण्णाद्रमुक पक्ष पिछाडीवर गेला आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत पण या राज्यात वेल्लोरची निवडणूक रद्द करण्याची कारवाई झाली होती.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 10:41 AM IST

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसची मुसंडी

चेन्नई, 23 मे : तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे तर जयललितांचा अण्णाद्रमुक आणि भाजपची युती पिछाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत पण या राज्यात पैशाच्या अतिवापरामुळे वेल्लोरची निवडणूक रद्द करण्याची कारवाई झाली होती.

भाजपशी अण्णाद्रमुकशी युती

यावेळच्या लोकसभा निवडणुकासाठी या राज्यात भाजपने जयललितांचा अण्णाद्रमुक, पीएमके आणि डीएमडीके या पक्षांसोबत युती केली होती.

काँग्रेसची द्रमुकशी युती

दुसरीकडे काँग्रेसने द्रमुक, एमडीएमके, व्हीएसके, सीपीआय आणि सीपीएम या पक्षांशी युती केली. या दोन महाआघाड्यांमध्ये तामिळनाडूची लढत होती.

Loading...

2014 ची निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जयललितांच्या अण्माद्रमुक पक्षाला 10 जागा मिळाल्या तर द्रमुकला 11 जागा मिळाल्या होत्या. एमडीएमतके आणि पीएमके या पक्षांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची इथे मर्यादित ताकद असल्याने या दोन्ही पक्षांना अण्णाद्रमुक आणि द्रमुक या पक्षांचाच आधार घ्यावा लागतो.

कमल हासन यांचा उदय

या दोन मुख्य आघाड्यांसोबतच तामिळनाडूमध्ये 2 नव्या पक्षांचाही उदय झाला. कमल हासन यांची मक्कल निधि मय्यम आणि शशिकला यांचा भाचा दिनकरन यांचा अम्मा मक्कल मुनेत्र कळगम हे ते दोन पक्ष.या दोन पक्षांनीही इथली राजकीय समीकरणं बदलली. कमल हासन यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही इथली निवडणूक चांगलीच गाजली.

द्रमुकची पकड मजबूत

जयललिता यांच्या निधनानंतरचा अण्णाद्रमुक आणि एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक यांच्यातल्या लढतीकडे इथे सगळ्यांचंच लक्ष होतं.या लढतीत यावेळी काँग्रेस - डीएमके या युतीची स्थिती मजबूत दिसली.जयललिता यांच्या निधनानंतर पलानीस्वामी सरकारच्या विरोधात लाट पाहायला मिळाली.

================================================================

VIDEO : अब की बार..., भाजपसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...