lok sabha election result 2019: भोपाळमधून प्रज्ञासिंग ठाकूर आघाडीवर, ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 29 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 09:15 AM IST

lok sabha election result 2019: भोपाळमधून प्रज्ञासिंग ठाकूर आघाडीवर, ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर

भोपाळ, 23 मे: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 29 जागांसाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे. 2014मध्ये भाजपने 27 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली होती. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती.

LIVE UPDATE

-भोपाळमधून प्रज्ञासिंग ठाकूर आघाडीवर, काँग्रेसचे दिग्विजय सिंग पिछाडीवर

- गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर


Loading...

भोपाळमधून भाजपने साध्वी प्रज्ञासिंग यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना उमेदवारी दिली आहे.संपूर्ण देशाचे लक्ष मध्य प्रदेशमधील या हायव्होल्टेज मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे.

राज्यात 4 टप्प्यात मतदान झाले होते. यासाठी 71.2 टक्के मतदान झाले होते. याआधी म्हणजे 2014च्या तुलनेत राज्यात 9.36 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. त्यामुळे राज्यातील जनता यंदा कोणाला कौल देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 27 तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. तेव्हा छिंदवाडामधून कमलनाथ यांनी तर गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे यांनी विजय मिळवला होता. यावेळी छिंदवाडामधून कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कमलनाथ प्रथमच छिंदवाडामधून निवडणूक लढत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 06:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...