लोकसभा निवडणूक निकाल LIVE : पंजाबमध्ये काँग्रेसला यश, या एकाच राज्यात काँग्रेसचा विजय

लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसने चांगलं यश मिळवलं आहे. इथे काँग्रेस विरुद्ध भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती अशी लढत होती. काँग्रेसला विजय मिळवून देणारं पंजाब हे एकमेव राज्य आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 12:17 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : पंजाबमध्ये काँग्रेसला यश, या एकाच राज्यात काँग्रेसचा विजय

चंदिगड, 23 मे : लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसने चांगलं यश मिळवलं आहे. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे. इथे भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही इथून निवडणूक लढवली. देशभरात पंजाब हे असं एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसला विजय मिळाला आहे. तामिळनाडूमध्येही द्रमुक आणि काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पण राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसचं मोठं नुकसान झालं.

काँग्रेस VS भाजप - शिरोमणी अकाली दल

पंजाबमध्ये गुरुदासपुर,अमृतसर,संगरूर, पटियाला ,होशियारपुर,फतेहगढ़ साहिब, फरीदकोट, आनंदपुर साहिब , लुधियाना , फिरोजपुर ,खडूर साहिब आणि जालंधर अशा 13 जागा आहेत. इथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप - शिरोमणी अकाली दल यांच्यातच होती.

पंजाबमध्ये गुरुदासपूरमधून मात्र भाजपचे उमेदवार आणि अभिनेते सनी देओल आघाडीवर आहेत तर संगरूरमधल्या एकाच जागेवर आम आदमी पक्ष यश मिळवू शकला.

हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपचं यश

Loading...

भाजपने हिंदीभाषक राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या सगळ्या राज्यांत भाजपने काँग्रेसवर चांगलीच मात केली आहे. हिंदीभाषक राज्यांमध्ये 225 जागा आहेत.

याआधी मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे या राज्यांमध्ये इथे नेमकं काय होणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची जोरदार आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांच्या सपा - बसपा आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. इथे भाजपनेच त्यांच्यावर मात केली.

मध्य प्रदेशमधल्या 29 जागांपैकी 25 पेक्षा जास्त जागांवर भाजपची आघाडी आहे.

राजस्थानमध्येही काँग्रेसचं नुकसान

राजस्थानमधल्या 25 जागांपैकी बहुतांश जागा भाजपनेच मिळवल्या. काँग्रेसचं इथे मोठं नुकसान झालं. मध्य प्रदेशमध्येही भाजपचंच वर्चस्व दिसून येतं आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपला 200 जागा मिळाल्या होत्या. या यशामुळेच भाजप आणि एनडीएनेच देशभरामध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.

==================================================================

VIDEO : आता 'लावा ना व्हिडिओ', मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...