राहुल गांधी हरले, आता संन्यास कधी घेणार? सिद्धू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

राहुल गांधी हरले, आता संन्यास कधी घेणार? सिद्धू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

राहुल गांधी हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले होते. आता राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाल्यानंतर, सिद्धू संन्यास कधी घेणार ? असा प्रश्न त्यांना विचारला जातोय.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेत असतात. आता ते राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. राहुल गांधी हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं सिद्धू म्हणाले होते. आता राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाल्यानंतर, सिद्धू संन्यास कधी घेणार ? असा प्रश्न त्यांना विचारला जातोय. सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी यावरून ट्रोल केलं आहे.

अमरिंदरसिंग यांच्यावर टीका

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावरही टीका केली. आपल्या पत्नीला उमेदवारी न दिल्यामुळे सिद्धू नाराज होते. आपल्याच पक्षाच्या दिग्गज नेत्यावर टीका केल्यामुळे सोशल मीडियावर सिद्धू ट्रोल होत राहिले.

मागच्या महिन्यात वक्तव्य

राहुल गांधी अमेठीतून हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं ते मागच्याच महिन्यात म्हणाले. आता राहुल गांधी हरले तर सिद्धू काय करणार, असं लोक विचारत आहेत. सरदार आपल्या वक्तव्यावरून मागे हटत नाही, असं म्हणतात. मग सिद्धू आपल्या वक्तव्यावरून मागे का हटले, याचीही आठवण काहींनी करून दिली.

आता सिद्धू या सगळ्या टिकेला काय उत्तर देणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी जवानांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर त्यांना कपिल शर्मा शो मधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांच्या जागी आता अर्चना पूरणसिंग या शो मध्ये आल्या.

======================================================================================

VIDEO : पंकजांनी घेतलं आपल्या लाडक्या बहिणीला उचलून!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading