लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : मनेका गांधी सुलतानपूरमध्ये पिछाडीवर

लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : मनेका गांधी सुलतानपूरमध्ये पिछाडीवर

भाजप नेत्या मनेका गांधी सुलतानपूरमध्ये पिछाडीवर आहेत. मनेका गांधी आणि वरुण गांधी यांच्या मतदारसंघात यावेळी अदलाबदल करण्यात आली होती. वरुण गांधींनी मनेकांच्या पिलीभीतमधून निवडणूक लढवली.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे : भाजप नेत्या मनेका गांधी सुलतानपूरमध्ये पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमधल्या सुलतानपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांची लढत बहुजन समाज पक्षाचे चंद्रभद्र सिंग यांच्याशी आहे. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वरुण गांधी यांच्या मतदारसंघात यावेळी अदलाबदल करण्यात आली होती. वरुण गांधींनी मनेकांच्या पिलीभीतमधून निवडणूक लढवली.

गेल्या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी सूलतानपूरहून तर मनेका गांधी पिलभीत मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मनेका गांधी यांनी आतापर्यंत सहा वेळा पिलिभीत मतदारसंघातून विजय मिळवला आहे. अनेक वर्षे खासदारकी भूषवूनही पिलभीतचा विकास झालेला नाही, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. वरुण गांधी प्रचार करताना त्यांची आई मनेका यांचा उल्लेख करतात. पण भाजपच्या अन्य उमेदवारांप्रमाणे ते पंतप्रधान मोदी यांचे नावही प्रचारात घेत नाहीत. पक्षाकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळेच ते सध्या पक्षावर काहीसे नाराज आहेत.

लोकसभेच्या गेल्या सात निवडणुकांपैकी सहा वेळा मनेका गांधी तर एकदा वरुण पिलभीतमधून विजयी झाले होते. वरुण गांधी यांचा सामना समाजवादी पार्टीचे हेमराज वर्मा यांच्याशी आहे. वर्मा इतर मागासवर्गीय समाजातील लोढ समाजाचे असून, या समाजाचे तीन लाख मतदार आहेत. दोन लाख अनुसूचित जातीचे तर सुमारे पाच लाख मुस्लीम मतदार आहेत.

सुलतानपूरमध्ये वरुण यांना निवडून येणे कठीण जाईल याचा अंदाज आल्याने मनेका गांधी यांनीच मतदारसंघांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या नेतृत्वापुढे ठेवला होता. दोन्ही जागा जिंकून आणण्याची जबाबदारी मनेका गांधी यांनी घेतल्यानेच अदलाबदल करण्यात आल्याचं बोललं जात होतं.

================================================================================

VIDEO : मतमोजणीचा पहिला कल, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी भाजप आघाडीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading