S M L

लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणूमल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होती.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 09:56 AM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर

कोलकाता, 23 मे: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणूमल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होती. बंगाली राजकारणात ऐतिहासिक ठरू शकेल अशी 2019 ची लोकसभेची निवडणूक या राज्याबरोबर देशाचा कौलही ठरवेल असं म्हटलं जातंय. बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी या राज्यावर चांगला जम बसवला असतानाच आता भाजपचा वारू हळूहळू बंगाल काबीज करू पाहत होता. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. ममता विरुद्ध मोदी असा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगला होता.

लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.

मा, माटी, मानुष असं सांगत डाव्यांना धूर चारणाऱ्या ममता बॅनर्जी जवळपास दशकभरापासून बंगालवर प्रभुत्व गाजवत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठा मैलाचा दगड ठरणारी असेल.


गेल्या निवडणुकीत 34 जागा

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती. मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. चार जागा मिळवूनसुद्धा काँग्रेस वोट शेअरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची डावी आघाडी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवूनही 2 जागीच विजयी होऊ शकली होती.

=====================================================================================

Loading...

VIDEO : मतमोजणीचा पहिला कल, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी भाजप आघाडीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 09:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close