लोकसभा निवडणूक निकाल LIVE : काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती पिछाडीवर

काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पिछाडीवर आहेत. काश्मीरमध्ये 6 जागा आहेत. इथे भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनाच चांगलं यश मिळताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 04:27 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती पिछाडीवर

श्रीनगर, 23 मे : काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पिछाडीवर आहेत. काश्मीरमध्ये 6 जागा आहेत. इथे भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनाच चांगलं यश मिळताना दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला श्रीनगरमधून आघाडीवर आहेत.

गेल्या निवडणुकीत पीडीपीचा विजय

गेल्या लोकसभा निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये 3 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला इथे जम्मूमधल्या दोन जागा तर लडाखची एक अशा तीन जागा मिळाल्या होत्या.

विधानसभा निवडणूक कधी?

काश्मीरमध्ये लोकसभेची निवडणूक झाली असली तरी विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याबद्दल काही कळू शकलेलं नाही.

Loading...

जम्मू काश्मीर राज्यात लोकसभेच्या 6 जागा आहेत. मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनागमधून निवडणूक लढवली. इथे सुरक्षेच्या कारणांसाठी एकाच मतदारसंघात तीन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली होती. मेहबुबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सचे हसनैन मसुदी यांनी लढत दिली. अनंतनाग हा एकेकाळी पीडीपीचा बालेकिल्ला होता. पण आता मात्र हा गड ढासळतो आहे.

गेल्या वर्षी युती तुटली

जम्मू - काश्मीर विधानसभेत भाजप आणि पीडीपीची युती तुटल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

पुलवामा विधानसभा मतदारसंघ

मेहबुबा मुफ्ती यांनी ज्या अनंतनाग मतदारसंघातून निवडणूक लढवली त्याच मतदारसंघात पुलवामा विधानसभा मतदारसंघही येतो. इथेच CRPF च्या 40 जवांनावर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला.

=======================================================================

VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...