लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : कर्नाटकमध्ये भाजपला यश, काँग्रेस - JDS पिछाडीवर

कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या राज्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत होती. कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार असलं तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपलाच यश मिळालं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 12:43 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : कर्नाटकमध्ये भाजपला यश, काँग्रेस - JDS पिछाडीवर

बंगळुरू, 23 मे : कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या राज्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत होती. कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार असलं तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपलाच यश मिळालं आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत.

2014 लोकसभा निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसकडे 9 जागा होत्या तर जनता दल सेक्युलर या पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या.

राजकीय गणितं बदलणार ?

कर्नाटकमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमुळे इथे राजकीय गणितं बदललेली पाहायला मिळाली. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस आणि जेडीएस यांचं संयुक्त सरकार आहे. पण याही सरकारच्या स्थैर्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading...

जोरदार चुरस

कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपला जोरदार यश मिळेल, असा दावा केला होता. या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर पक्षात मतभेद होतील, असंही त्यांचं म्हणणं होते. भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये इथे जोरदार चुरस पाहायला मिळाली.

फिर एक बार मोदी सरकार

देशभरातच भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र द्रमुक आणि काँग्रेसला चांगलं यश मिळालं. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे आता कर्नाटकवर भाजपचंच वर्चस्व आहे.

=======================================================================================

VIDEO : भाजपचा विराट विजय, मोदींना त्यांच्या आईने असे दिले आशिर्वाद!

========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...