आंध्र प्रदेशचा नवा हिरो, चंद्राबाबू आणि मोदी दोघेही झिरो !

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 03:57 PM IST

आंध्र प्रदेशचा नवा हिरो, चंद्राबाबू आणि मोदी दोघेही झिरो !

अमरावती, 23 मे : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. जगनमोहन रेड्डींनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली.

वायएसआर रेड्डींचा मुलगा

जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा मुलगा आहेत. 2009 मध्ये वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी हेच त्यांचे राजकीय वारसदार बनले. जगनमोहन रेड्डी हे साक्षी वृत्तपत्र आणि साक्षी टीव्ही चॅनलचे मालक आहेत.

3 हजार किमीची पदयात्रा

जगनमोहन रेड्डी यांचा झंझावाती प्रचार पाहता यावेळी ते इथे यशस्वी होतील, असं बोललं जात होतं.त्यांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी पदयात्रा काढून जंगी तयारी केली होती. त्यांची तब्बल 430 दिवसांची प्रजा संकल्प पदयात्रा या निवडणुकांमध्ये खूपच गाजली.

Loading...

आपल्या कडापा जिल्ह्यातून त्यांनी या पदयात्रेची सुरुवात केली आणि ते 13 जिल्ह्यांमध्ये 125 विधानसभा मतदारसंघात फिरले. ''रावळी जगन, कावळी जगन अशी त्यांची घोषणा होती. जगनमोहन निवडून आले पाहिजेत, आम्हाला जगनमोहन हवे आहेत, असा याचा अर्थ.

चंद्राबाबूंचा पराभव

आंध्र प्रदेशमध्ये काढलेली ही 3 हजार किलोमीटरची पदयात्रा जगनमोहन यांना यश देऊन गेली आणि चंद्राबाबू नायडूंच्या सत्ताधारी तेलगु देसम पक्षाला पराभव पत्करावा लागला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांचा पराभव झाला होता. त्यांना 175 जागांपैकी 67 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता मात्र त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे.

बेहिशोबी संपत्ती प्रकरणी तुुरुंगवास

जगनमोहन रेड्डी यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगातही जावं लागलं होतं. पाच वर्षांपेक्षाही कमी काळात त्यांची संपत्ती 24 कोटीपासून 470 कोटी रुपयांपर्यत कशी वाढली याची चौकशी सुरूच आहे. '

वडिलांची परंपरा

जगनमोहन रेड्डी यांचे वडील वायएसआर रे़ड्डी हे आंध्र प्रदेशचे अत्यंत प्रभावी नेते होते. वायएसआर रेड्डी यांनीही शेतकऱ्यांसाठी 1600 किलोमीटरची पदयात्रा काढून आंध्र प्रदेशमधल्या ग्रामीण भागावर आपली पक़ड मजबूत केली होती. वायएसआर रेड्डी यांच्या निधनानंतर एक वर्षाने म्हणजे 2010 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि वायएसआर रेड्डी यांच्या नावाने वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. आता आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षाचं सरकार येणार आहे.

===============================================================================

VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...