गुजरातमध्ये अमित शहांना सर्वाधिक आघाडी, भाजप पुन्हा मारणार बाजी

गुजरातमध्ये अमित शहांना सर्वाधिक आघाडी, भाजप पुन्हा मारणार बाजी

भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत असलेल्या गांधीनगरमध्ये त्यांना प्रचंड लीड मिळाला असून सुरुवातींच्या फेऱ्यांमध्ये त्यांना तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त लीड आहे.

  • Share this:

गांधीनगर 23 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजप तब्बल 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला दोन जागांची आघाडी मिळालीय. 2014 च्या निवडणुकीत भाजपला इथे सर्व जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे याही निवडणुकीत भाजप एक दोन जागा कमी वाटत असल्या तरी राज्यात भाजपची कामगिरी दमदार असेल अशीच शक्यता आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत असलेल्या गांधीनगरमध्ये त्यांना प्रचंड लीड मिळाला असून सुरुवातींच्या फेऱ्यांमध्ये त्यांना तब्बल 15 हजारांचा लीड असल्याची माहिती आहे. तर इतर अनेक ठिकाणी भाजप उमेदवार पुढे आहेत

2014मध्ये भाजपची कामगिरी

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा जवळपास दुप्पट होती. ३६ टक्के लोकांनी मोदींना तर काँग्रेसच्या या तीन दिग्गज नेत्यांना १९ टक्के लोकांनी पसंती दिली.

भाजपने २०१४ मध्ये जिंकलेल्या २८२ जागांपैकी १३७ जागांमध्ये अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती.

१६९ जागांमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित टक्केवारीपेक्षा जास्त आहे.

चार पैकी तीन जागांवर (७३ टक्के) भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली आघाडी ही एक लाखांपेक्षा जास्त मतांची आहे. पाच पैकी तीन ठिकाणी भाजपने काँग्रेसला हरवलंय.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर भाजपला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली मतांची टक्केवारी ही काँग्रेसपेक्षा जास्त होती. वाजपेयी पंतप्रधान असताना झालेल्या निवडणुकांमध्येही मिळालेल्या मतांचं प्रमाण हे भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त होते.

२००९ च्या निवडणुकीपासून फक्त पंजाब या राज्यातच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी झाली. तर सर्वाधिक वाढ उत्तर प्रदेशात झाली. २०१४ मध्ये भाजपला २४.८ टक्के एवढी मतं मिळाली.

सहा राज्यांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी भाजपला अर्ध्याहून जास्त मतं मिळाली होती. गुजरात, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा आणि हिमाचल प्रदेश ही ती राज्य आहेत.

गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गोवा या सहा राज्यांमध्ये भाजपला सर्व जागा मिळाल्या होत्या.

भाजपने शहरी भागांमध्ये दोन तृतीयांश ५७ पैकी ३७ तर ग्रामीण भागातल्या अर्ध्याहून जास्त ३४२ पैकी १७८ जागा जिंकल्या होत्या.

पाचपैकी दोन मुस्लिमांनी काँग्रेसला मत दिलं तर उच्च जातींच्या हिंदूंमध्ये दोन पैकी एकाने भाजपला मत दिलं.

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या (१८ ते २२ वयोगट) ३६ टक्के तरुणांनी भाजपला मतदान केलं. तर काँग्रेसला केवळ १७ टक्के तरुणांनी मत दिलीत.

नऊ राज्यांमध्ये NDA ला ९० टक्क्यांहून जास्त तर सहा राज्यांमध्ये सर्व जागा मिळाल्या.

गुजरात २६/२६

राजस्थान २५/२५

दिल्ली ७/७

उत्तराखंड ५/५

हिमाचल प्रदेश ४/४

गोवा २/२

मध्य प्रदेश २७/२७

उत्तर प्रदेश ७३/८०

पंजाब ९/१०

First published: May 23, 2019, 9:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading