बिहारमधल्या बेगुसरायमधून कन्हैयाकुमार पिछाडीवर

बिहारमधल्या बेगुसरायमधून कन्हैयाकुमार पिछाडीवर

बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघात कन्हैयाकुमार पिछाडीवर आहे. कन्हैयाकुमारची लढत इथे भाजपचे नेते गिरीराज सिंह यांच्याशी आहे.

  • Share this:

पाटणा,23 मे : बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघात कन्हैयाकुमार पिछाडीवर आहे. कन्हैयाकुमारची लढत इथे भाजपचे नेते गिरीराज सिंह यांच्याशी आहे. बेगुसराय मतदारसंघात भाजपचे नेते गिरीराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैयाकुमार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भाजपने गिरीराज सिंह यांना मतदारसंघ बदलून बेगुसरायमध्ये पाठवल्याने ते सुरुवातीला नाराज होते. पण नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते लढण्यास तयार झाले.

राष्ट्रीय पातळीवरची लढत

कन्हैयाकुमार हे रिंगणात असल्याने बेगुसराय मतदारसंघाकडे राष्ट्रीय पातळीवरची माध्यमं आणि राजकीय तज्ज्ञांचं या लढतीकडे लक्ष आहे. दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या वादात कन्हैयाकुमारचं नेतृत्व पुढे आलं. कन्हैयाकुमारने हा आपलं मूळ गाव बेगुसरायमधून निवडणूक लढवली. त्याने निवडणक लढवण्यासाठी लोकांकडून निधी जमा केला होता.

मतांचं विभाजन

गिरीराज सिंह आणि कन्हैयाकुमार हे दोघेही भूमिहार आहेत. या मतदारसंघात 23 टक्के मतदार हे भूमिहार समाजाचे मतदार असून या मतांचं विभाजन होईल, असं म्हटलं जात होतं.

गेल्या निवडणुकीत राजदच्या तन्वीर हसन यांना तीन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. इथली मुस्लीम मतं ही कन्हैयाकुमार आणि तन्वीर यांच्यात विभागली जाणार आहेत.याचाच भाजपला फायदा होऊ शकतो.

या मतदारसंघात एकेकाळी डाव्यांचं प्राबल्य होतं. पण १९९०च्या दशकापासून डाव्यांच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. गेल्या निवडणुकीत भाजपला (३९.७२ टक्के), राजदला (३४.३१ टक्के) तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १७.८७ टक्के मते मिळाली होती.

============================================================================

VIDEO : मतमोजणीचा पहिला कल, महाराष्ट्रात या ठिकाणी भाजप आघाडीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 09:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading