lok sabha election result 2019: दिल्लीत तिरंगी लढत, देशाची राजधानीत कोण बाजी मारणार?

lok sabha election result 2019: दिल्लीत तिरंगी लढत, देशाची राजधानीत कोण बाजी मारणार?

क्रीडापटू, केंद्रीयमंत्री आदी हायप्रोफाईल उमेदवारांमुळे देशाची राजधानी दिल्लीतील निकालावर सर्वांची नजर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे: देशाची राजधानी दिल्लीत लोकसभेच्या 7 जागा आहेत. दिल्लीत 56.86 टक्के मतदान झाले होते. 2014मध्ये भाजपने येथील सर्व जागांवर विजय मिळवला होता. पूर्व दिल्लीतून भाजपने गौतम गंभीर, उत्तर पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस, उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित, बॉक्सर विजेंदर सिंह यांच्यामुळे दिल्लीतील निकालावर सर्वांची नजर आहे.

राजधानी दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या तीन पक्षात लढत पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला 6 जागा तर काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या आपला एकही जागा मिळणार नसल्याचे एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 07:36 AM IST

ताज्या बातम्या