अमेठीतील राहुल गांधींचा पराभव आणि नंबर 21चे कनेक्शन!

अमेठीतील राहुल गांधींचा पराभव आणि नंबर 21चे कनेक्शन!

यंदा मोदी त्सुनामीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला.

  • Share this:

अमेठी, 23 मे: देशात काँग्रेससाठी कितीही खराब निकाल असो, इतक नव्हे तर उत्तर प्रदेशमध्ये देखील काँग्रेसचा कितीही मोठा पराभव झाला तरी रायबरेली आणि अमेठी येथील त्यांचा विजय ठरलेला असतो. रायबरेलीतून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा अमेठी मधून विजय होतो. 2014च्या मोदी लाटेत देखील या दोन्ही जागा काँग्रेसला मिळल्या होत्या. पण यंदा मोदी त्सुनामीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. 1967मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसचा पराभव होण्याची ही तिसरी वेळ आहे.

काँग्रेसच्या या पराभवात 21 नंबर महत्त्वाचा आहे. प्रत्येक 21 वर्षानंतर अमेठीमधून काँग्रेसचा पराभव झाला आहे. राहुल गांधींच्या या पराभवामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. 1977 मध्ये इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केल्यानंतर काँग्रेस विरोधातील लाटेत या मतदारसंघातून संजय गांधींचा पराभव झाला होता. अमेठीतून पराभव होण्याची ही काँग्रेसची पहिली वेळ होती. जनता पार्टीच्या रविंद्र प्रताम सिंह यांनी संजय गांधींचा पराभव केला होता.

त्यानंतर 21 वर्षांनी 1998मध्ये काँग्रेसच्या कॅप्टन सतीश शर्मा यांचा पराभव झाला होता. भाजपचे उमेदवार संजय सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर 21 वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या पराभवाने ही गोष्टी पुन्हा एकदा समोर आली. अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा 19 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

गेल्या निवडणुकीत इराणी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यानंतर पाच वर्ष त्या अमेठीमध्ये मेहनत घेत होत्या. त्याचा परिणाम आजच्या निकालात दिसला. रायबरेलीतून सोनिया गांधी यांचा विजय झाला आहे. पण त्यांचे विजयाचे अंतर कमी झाले आहे.

VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading