मराठी बातम्या /बातम्या /देश /

'शतरंज के खिलाडी' अमित शहा : फारशा माहीत नसलेल्या 10 गोष्टी

'शतरंज के खिलाडी' अमित शहा : फारशा माहीत नसलेल्या 10 गोष्टी

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. शहांची व्यूहरचना कशातून आली होती? 'शतरंज के खिलाडी' अमित शहांच्या यशामागे ही आहेत 10 कारणं

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. शहांची व्यूहरचना कशातून आली होती? 'शतरंज के खिलाडी' अमित शहांच्या यशामागे ही आहेत 10 कारणं

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. शहांची व्यूहरचना कशातून आली होती? 'शतरंज के खिलाडी' अमित शहांच्या यशामागे ही आहेत 10 कारणं

1 अमित शहा उत्तम बुद्धीबळपटू आहेत. बुद्धीचा वापर चलाखीने करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यात हा खेळाडू तरबेज आहे. गुजरात चेस असोसिएशनचे ते चेअरमन होते. राजकीय कट- काटशहांच्या चाली करण्यात ते किती तरबेज आहेत, हे या निवडणुकांनी दाखवून दिलंच आहे. 2 अमित शहा यांना नाटकांची आवड आहे. रंगभूमीवरचं त्यांचं प्रेम थेट विद्यार्थीजीवनापासूनचं आहे. विद्यार्थी जीवनात त्यांनी अनेक वेळा नाटकांमधून कामं केली होती. नाटकावरचं हे प्रेम राजकीय रंगमंचावर त्यांना किती उपयोगी पडलं हे तेच सांगू शकतील. 3 शास्त्रीय संगीत ऐकणं हा अमित शहांचा आवडता छंद आहे. राजकीय ताण-तणावातून थोडा काळ दूर जाण्यासाठी ते आवर्जून शास्त्रीय संगीत ऐकतात किंवा बुद्धीबळाचा डाव मांडतात. 4 अमित शहा पक्के खवय्ये आहेत, असं सांगतात. मसालेदार, चमचमीत खाणं त्यांना आवडतं. पावभाजी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. 5 लांबच्या प्रवासामध्ये संगीत ऐकत जाणं ते पसंत करतात. मुकेशची गाणी त्यांना भावतात. कधीतरी अंताक्षरी खेळायलाही त्यांना आवडतं. अमित शहांचे निकटवर्तीय सांगतात की, ते गाण्याच्या भेंड्या खेळताना कधीच हरत नाहीत. शेकडो हिंदी गाणी त्यांच्या तोंडावर आहेत. 6 2019 च्या निवडणुका जिंकण्यासाठी अमित शहांनी मोठी व्यूहरचना आखली होती. ते स्वतः प्रचाराच्या धामधुमीत सर्वात पुढे होते. 161 रॅली, प्रचारसभा आणि 18 रोड शो त्यांनी केले. त्यापूर्वी 312 लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश विजयवर्गीय सांगतात की, एखादा मेहनती विद्यार्थी जसा मन लावून सातत्याने अभ्यास करतो, तसे अमित शहा निवडणुकीची तयारी सर्व जोर लावून करतात. मोदी त्सुनामी, देशाच्या जनतेने 1984नंतर दिला ऐतिहासिक कौल! Analysis : या कारणांमुळे झाला सोलापूरात पुन्हा भाजपचा विजय! लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : अवघ्या जगाला उत्तर देणारा नरेंद्र मोदींचा प्रचंड विजय 7 अमित शहांनी वयाच्या 17 व्या वर्षी आर्य चाणक्याचा सारा इतिहास वाचला होता. कौटिल्याच्या राजनीतीचा प्रभाव त्यांच्यावर तेव्हापासूनच पडला होता. भाजपच्या विजयामागचे चाणक्य असं त्यांना म्हणतात, ते उगीच नाही. 8 ज्येष्ठ पत्रकार हिमांशु मिश्र सांगतात की, अमित शहांचे टीकाकार त्यांच्या राजकारणावर आणि विचारांवर टीका करू शकतात. पण त्यांची राजकारणावरची पकड आणि ते घेत असलेली मेहनत यावर कोणी शंका उपस्थित करणार नाही. वेगवेगळ्या प्रांतातल्या आणि भाषांतल्या वृत्तपत्रांमध्ये काय छापून आलंय हे त्यांना सकाळी 7 वाजायच्या आत माहिती असतं. सकाळी 6 वाजता सगळे डिटेल्स त्यांच्या टेबलावर असतात. 9 प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्याचा आढावा घेत ते रणनीती आखतात. 2019 च्या निवडणुकीची तयारी शहांन कितीतरी आधीपासून सुरू केली होती. मार्च 2017 पर्यंत त्यांच्या दौऱ्यांची आकडेवारी पाहिली तर दरदिवशी त्यांनी सरासरी 524 किमी प्रवास केला. त्या वेळी 32 दिवसात 5,07,000 किमी पेक्षा जास्त प्रवास त्यांनी केला होता. देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचं काम त्यांनी असं पद्धतशीरपणे केलं. 10. अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि भाजपची विजयी परंपरा सुरू झाली. अध्यक्षपदाच्या पहिल्याच वर्षी भाजपने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या विधानसभा जिंकल्या. जम्मू काश्मीरमध्येही पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपद भाजपला मिळालं. त्यानंतर महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला. दिल्ली आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर अमित शहांच्या नेतृत्वावर काही पक्षश्रेष्ठींनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. पण आसाम आणि त्रिपुराच्या विजयामुळे अमित शहांचे प्रशंसक वाढले. बिहारमध्येही नितीश कुमारांच्या बरोबरीने भाजप सत्तेत आलं. हे आहेत देशातले सर्वांत धक्कादायक 9 निकाल; या दिग्गजांना बसला दणका भाजप आणि NDAच्या ऐतिहासिक विजयावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया मोदींच्या ऐतिहासिक विजयात 'या' राज्यांनी दिला धक्कादायक निकाल!
First published:

Tags: Election 2019, Lok sabha election 2019

पुढील बातम्या