वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मोदी त्सुनामी, अशी घेतली दखल

लोकसभेच्या निकालाची वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर वेगवेगळ्या प्रकारे कशी दखल घेतली ते पाहण्यासारखं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 02:16 PM IST

वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मोदी त्सुनामी, अशी घेतली दखल

2019 च्या लोकसभेत मोदी त्सुनामीत काँग्रेससह इतर पक्षांची धूळदाण उडाली. देशातील या मोठ्या घडामोडीचं वार्तांकन करताना वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर वेगवेगळ्या प्रकारे कशी दखल घेतली ते पाहण्यासारखं आहे.

2014 मध्ये 282 जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी 300 च्या वर जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे.

मोदी लाटेत 2014 ला काँग्रेसला फक्त 44 जिंकता आल्या होत्या. यावेळी मोदी त्सुनामीतही काँग्रेसची पुरती वाताहत झाली असली तरी 2014 च्या तुलनेत 8 जागा अधिक जिंकल्या.

Loading...

काँग्रेसने गेल्या लोकसभेपेक्षा 8 जागा अधिक जिंकल्या असल्या तरी त्यांच्या दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

एनडीएतील दोन नंबरचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या पहिल्या पानावरही कमळ फुललं. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीतून पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपच्या स्मृती ईराणींनी या ठिकाणी राहुल गांधींना पराभूत केलं.

लोकसभा निवडणुक झाली आता क्रिडा प्रेमींचे लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपकडे लागून राहिलं आहे. त्याचा खुबीने वापर करत 'सकाळ'ने पहिल्या पानाची सजावट केली आहे.

लोकसत्ताने पहिल्या पानावर 'मोदीच!' या एका शब्दात हेडलाईन दिली आहे.

भाजपच्या संसदीय समितीची शनिवारी बैठक होणार असून त्यात मोदींची पंतप्रधानपदी निवड केली जाईल. तसेच सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींची भेट घेतील.

2014 ची मोदी लाट ओसरली असा सूर विरोधकांनी लावला होता पण येणाऱ्या त्सुनामीची कल्पनाच त्यांना नव्हती हे लोकसभेच्या निकालानंतर दिसून आलं.

न्यू यॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर भारतातील लोकसभ निवडणुक निकालाची बातमी फोटोशिवाय छापली आहे.

टेलिग्राफने मोदींनी शेवटच्या क्षणी घेतलेल्या पत्रकार परिषदेची बातमी देताना पहिल्या पानावर त्यासाठी जागा रिकामी ठेवली होती. आता त्यांच्या विजयानंतर पुन्हा मोदी इतकंच लिहलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...