महाराष्ट्रच नाही देशातील 'या' 23 राज्यात काँग्रेसची धूळधाण

महाराष्ट्रच नाही देशातील 'या' 23 राज्यात काँग्रेसची धूळधाण

या निवडणुकीत कॉंग्रेसच्या निराशाजनक पराभावामुळं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे : लोकसभा निवडणुकी यंदाही भाजपचा डंका वाजला. एकट्या भाजपनं बहुमताचा आकडा पार केला. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या निराशाजनक पराभावामुळं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 2014च्या निवडणुकीत 44 जागा मिळवणाऱ्या कॉंग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. लोकसभेचा हा निकाल चिंताजनक असण्याचे प्रमुख कारण म्हणजे, विधानसभेत कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतही त्यांना सपशेल पराभव सहन करावा लागला. याव्यतिरिक्त पूर्व युपीमध्ये प्रियांका गांधी आणि पश्चिम युपीमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपवलेली कमान त्यांना राखण्यातही अपयश आले आहे. एवढेच नाही तर, काही राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आता कॉंग्रेसमुक्त झाले आहे.

1. जम्मू-कश्मीर

देशातील सर्वात उत्तरेला असलेल्या राज्यात कॉंग्रेसला सपशेल पराभव सहन करावा लागला आहे. येथील एकूण 6 जागांपैकी 3 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, उरलेल्या तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कॉंग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता येत नाही. एवढचं नाही तर, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांही पराभवाच्या वाटेवर आहेत.

2. अंदमान-निकोबार

केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान निकोबार येथील एकमात्र लोकसभेच्या जागेवर सध्या भाजप आघाडीवर आहे.

3. आंध्र प्रदेश

दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाची जागा असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये एकूण 25 जागांसाठी लोकसभा लढत होती. यातील 24 जागांवर वाईएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांना बहुमत मिळाले आहे. तर, एका जागेवर टीडीपीला विजय मिळवता आला आहे.

4. अरुणाचल प्रदेश

या पूर्वोत्तर राज्यातील दोन जागांसाठी लढत होती. त्यातील दोन्ही जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे.

5. बिहारमध्ये केवळ 1 जागा

बिहारमधील लढत रोमांचक होणार असे वाटत असताना, येथील 16 जागांवर भाजप, 16 जागांवर जेडीयू आघाडीवर आहे. तर, रामविलास पासवान यांचा एलजेपी पक्ष 6 जागांवर आघाडीवर आला. येथेही कॉंग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही.

6. चंदीगड

या केंद्रशासित प्रदेशातील एकमात्र जागेवर सध्या भाजपच्या किरण खेर आघाडीवर आहेत. त्याच्या विरोधात कॉंग्रेसचे पवन कुमार बंसल उभे आहेत.

7. दादरा नगर हवेली

येथील एका जागेवरही भाजपच आघाडीवर आहे.

8. दीव-दमन

येथील एका जागेवरही भाजपच आघाडीवर आहे.

9. गुजरातमध्ये भाजपचा क्लिन स्वीप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्यात पुन्हा एकदा भाजपनं क्लिन स्वीप केला आहे. 26 च्या 26 जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. 2014मध्येही त्यांनी सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

10. हरियाणा

उत्तर भारतातील या राज्यात भाजपची सत्ता आली आहे. येथील सर्व 10 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे.

11. हिमाचल

येथील चारही जागांवर भाजपनं आपलं वर्चस्व ठेवले आहे. 2014मध्येही कॉंग्रेसला एकही जागा मिळवता आली नव्हती.

12. उत्तराखंड

एवढचं नाही तर, उत्तर भारतील दुसरे पहाडी राज्य उत्तराखंडमध्ये पाचही जागांवर भाजप आघाडीवर आहे.

13. मध्यप्रदेश

मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपला धुळ चारली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना आपली जादू कायम राखता आली नाही. येथील 29 जागांवर भाजपनं आपला विजय जवळजवळ प्रस्थापित केला आहे. तर, एका जागेवर कॉंग्रेसला आघाडी मिळाली आहे. या एका जागेवर कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ आघाडीवर आहे.

14. महाराष्ट्र

महाराष्ट्रातील एकूण 48 जागांवर कॉंग्रेसला फक्त 1 जागा मिळताना दिसत आहे. तर भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे. तर, त्यांचा संयोगी पक्ष शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादीला केवळ 3 जागांवर आघाडी मिळाली आहे.

15. मणिपूर

कॉंग्रेसपक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष मानला जात होता. मात्र यंदा त्यांना छोट्या राज्यातही आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलेली नाही.

16. मिजोरम

येथील एकमात्र जागेवर मिजो नॅशनल फ्रंटला विजय मिळाला आहे.

17. ओडिसा

येथील 7 जागांवर भाजपनं आघाडी मिळवली आहे. तर, 14 जागांवर बीजेडी पक्ष आघाडीवर आहे.

18. दिल्ली

भारताची राजधानी दिल्लीमध्ये कॉंग्रेस आणि आप दोघांचा सुपडासाफ झाला आहे. येथे भाजपला सात जागा मिळण्याची शक्यता आहे.

19. राजस्थान

राजस्थानच्या सर्व जागांवर कॉंग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. एवढचं नाही तर जोधपुरमध्येही कॉंग्रेसला आपली जागा मिळवता आलेली नाही. राजस्थानमध्ये भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे.

20. सिक्किम

येथील एकमात्र जागेवर सध्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्च आघाडीवर आहे.

21. त्रिपुरा

येथील दोन्ही लोकसभा जागेंवर सध्या भाजप आघाडीवर आहे.

22. उत्तर प्रदेश

देशातील सगळ्या मोठा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला पराभव स्विकारावा लागला आहे. येथील 80 जागांवरील केवळ रायबरेलीतील एका जागेवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. सोनिया गांधी या जागेतून आघाडीवर आहे. 59 जागांवर भाजप, 6 जागांवर एसपी तर, 12 जागांवर बीएसपी आघाडीवर आहे.

23. पश्चिम बंगाल

ममता दीदींच्या घरच्या मैदानावर एकूण 42 जागांपैकी 19 जागांवर भाजपला आघाडी मिळाली आहे. तर, 22 जागांवर तृणमुल कॉंग्रेस आघाडीवर आहे.

VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!

First published: May 23, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading