News18 Lokmat

देशाचे पंतप्रधान परदेशात असतात; अभिनेत्यांना देतात मुलाखती – प्रियांका गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 03:56 PM IST

देशाचे पंतप्रधान परदेशात असतात; अभिनेत्यांना देतात मुलाखती – प्रियांका गांधी

नवी दिल्ली, 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिगर राजकीय चर्चा केली. यावेळी त्यांनी आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. दरम्यान, त्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत परदेशात असतात. ते अभिनेत्यांना मुलाखती देतात. अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. अक्षय कुमारनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी लहानपणातील गोष्टी, कुटुंब आदी गोष्टींवर चर्चा केली.

आज उद्योगपतींसाठी सर्वकाही केलं जात आहे. वाराणसीमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की नरेंद्र मोदी तिथं जात नाहीत. या सरकारनं रोजगार घटवण्याचं काम केलं. सरकारनं मनरेगाला पूर्णपणे बंद केलं. नेत्यानं जनतेच्या मनात काय आहे? हे जाणून घ्यायला हवं. त्यासाठी जनतेमध्ये मिसळलं पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण, नरेंद्र मोदी सतत परदेशात असतात. अशा शब्दात यावेळी प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांना कोर्टाचा दिलासा; 'निवडणूक लढवण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही'

अनेक गोष्टींवर गप्पा

- पंतप्रधान होण्याचा विचार देखील माझ्या मनात केव्हा आला नव्हता. कारण, मी साध्या कुटुंबात जन्माला आलो होतो. शिवाय, माझं आयुष्य देखील सामान्य माणसाप्रमाणे होतं. एका विशिष्ट पार्श्वभूमीतून आलेल्या माणसाला राजकीय उद्दीष्ट असतात. सामान्य माणूस त्याबद्दल विचार करत नाही. कदाचित मी एकादी नोकरी करत असतो.

Loading...

- मला सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची होती. 1962च्या युद्धावेळी ज्यावेळी मेहसाणा येथून सैनिकांना घेऊन ट्रेन्स जात होत्या. त्यावेळी मला देखील आपण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावं असं वाटत होतं.

- मला सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची होती. 1962च्या युद्धावेळी ज्यावेळी मेहसाणा येथून सैनिकांना घेऊन ट्रेन्स जात होत्या. त्यावेळी मला देखील आपण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावं असं वाटत होतं.

- राग येणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण, मला लगेच राग येत नाही. मी कामामध्ये काटेकोर आहे. याचा अर्थ मला राग येतो असा होत नाही.

- निवृत्तीनंतर मी काय करणार याबद्दल मी काहीही विचार केला नाही. मी नेहमी नवीन जबाबदारी घेत आलो आहे. निवृत्तीनंतर देखील मी काहीतरी नवीन करेन.


VIDEO: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, 2 अल्पवयीन मुलं जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...