लोकसभा निवडणुका वेळेवरच होणार, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट

लोकसभा निवडणुका वेळेवरच होणार, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट

लोकसभा निवडणुका वेळेत होतील अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मार्च : भारत - पाकिस्तानमध्ये तणाव परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तारखांबद्दल अफवांना पेव फुटला होता. पण, मुख्य निवडणूक आयुक्तांनी या संपूर्ण चर्चा आणि शक्यता फेटाळून लावल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका या वेळेवरच होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे तारखा देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका केव्हा होणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, निवडणूक आयुक्तांनी सर्व शक्यता फेटाळून लावत निवडणुका या वेळेवर होतील असं स्पष्ट केलं आहे.

पुलवामा दहशतवादी

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवादांविरोधात कठोर पावलं उचलली. शिवाय, पाकिस्तानला देखील खडेबोल सुनावले. शिवाय, भारतानं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. पाकिस्ताननं देखील भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडत चोख उत्तर दिलं. या कारवाईमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे पाकच्या भूमीत उतरल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर भारताने जिनिव्हा कराराची आठवण करून दिलं. त्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली. आज वाघा बार्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत भारतात परतणार आहेत. यावेळी वाघा बॉर्डवर होणारा 'बीटिंग द रिट्रीट' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

===============================

VIDEO: बालाकोटमधील दहशतवाद्यांचा असा रहायचा 'डे प्लॅन'

First published: March 1, 2019, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading