नरेंद्र मोदींनी ज्या खान मार्केटच्या नावाने टोमणे मारले ते नेमकं आहे काय?

नरेंद्र मोदींनी ज्या खान मार्केटच्या नावाने टोमणे मारले ते नेमकं आहे काय?

मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान मार्केटवरून टोमणे मारले त्यानंतर त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : खान मार्केट! सध्या सोसल मीडियावर याची जोरात चर्चा सुरू आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये खान मार्केटवरून टोमणे मारले. 'खान मार्केटमधील टोळीनं माझी ओळख निर्माण नाही केली.  मला 45 वर्षाच्या तपस्येनंतर ती मिळाली' असल्याचं मोदी यांनी म्हटलं. त्यानंतर खान मार्केटवर सोशल मीडियासह मार्केटमधील दुकानदारांमध्ये देखील चर्चा सुरू झाली.

काय आहे खान मार्केट

खान मार्केट नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? तर, 2017मध्ये खान मार्केट जगातील सर्वात महाग जागा ठरली होती. रिअर इस्टेट कन्सलटंट कंपनी कुशमॅन आणि वेकफील्डच्या रिपोर्टमध्ये तसा उल्लेख 2017मध्ये करण्यात आला होता. तर, 2016मध्ये खान मार्केट 28व्या स्थानावर होती.

जगातील राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये देखील खान मार्केटला मोठी पसंती आहे. खान मार्केटमध्ये असलेल्या कॅफे, रेस्टारंट देखील मोठे असून बड्या ब्रोकर्सच्या मीटिंग याच ठिकाणी होतात. इथं असलेल्या बेकरी आणि स्ट्रीट फुड कॉर्नर देखील प्रसिद्ध आहेत.

याशिवाय, इथं असलेली पुस्तकांची दुकानं, मोठ मोठे शोरूम आणि एकापेक्षा एक दुकानं देखील प्रसिद्ध आहेत. तसंच लायटिंगची दुकानं देखील जगात प्रसिद्ध आहेत.

नरेंद्र मोदीच नाही तर या नेत्याला देखील व्हायचंय पंतप्रधान; मोर्चे बांधणीला सुरूवात

ते खान चाचां कोण?

खान मार्केटमध्ये खान चाचा देखील प्रसिद्ध आहेत. पण, या खान चाचांचा आणि खान मार्केटला पडलेल्या नावाचा काहीही संबंध नाही. खान चाचांच्या हातचं जेवण प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला खान चाचांच्या हातचं स्वादिष्ट खाणं खायचं असतं.

खान मार्केटबद्दल काही रंजक गोष्टी

- खान अब्दुल गफ्फार खान नावावरून मार्केटचं नाव खान मार्केट पडलं.

- खाणं, पुस्तक किंवा तुम्हला रोज लागणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तुंपैकी प्रत्येक गोष्ट इथं मिळते.

- मार्केटमध्ये मोठ मोठ्या ब्रॅण्डचे शोरूम देखील आहेत.

- खाण्यापिण्याची देखील इथं चंगळ आहे.

पुण्यात हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार, धक्कादायक CCTV आला समोर

First published: May 13, 2019, 2:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading